शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

शाखाप्रमुख देणार घरोघरी योजनांची माहिती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 01:10 IST

उस्मानाबाद : केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र केवळ माहितीअभावी साठ टक्क्यांच्या आसपास लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ होत नाही.

उस्मानाबाद : केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र केवळ माहितीअभावी साठ टक्क्यांच्या आसपास लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ होत नाही. त्यामुळेच या योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहंचविण्यासाठी ‘शिवसेना आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी सांगितले. या माध्यमातून शाखाप्रमुख प्रत्येक कुटुंबांना विविध योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्रे आदी बाबींची माहिती प्रत्यक्ष भेटून देतील. शाखाप्रमुखांच्या या कामाचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतसांगितले.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांच्या विकासासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. परंतु, विविध कारणांमुळे आजही सदरील योजना गरजू कुटुंबांपर्यंत पोहोंचत नाहीत. उस्मानाबाद तालुक्यातील वडगावातील कुटुंबांचा सर्वे केला असता, तब्बल ६० टक्के कुटुंबे वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले. एवढेच काय, अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाही अनेक योजनांबाबत माहिती नसल्याचे पुढे आल्यानंतर ‘शिवसेना आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात ते म्हणाले. याअनुषंगाने २ सप्टेंबर रोजी सर्व शाखाप्रमुखांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. हे सर्व शाखाप्रमुख गावागावात जावून प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या योजनांची माहिती देतील. एवढेच नाही, तर योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोंचविण्यामध्ये ज्या काही अडचणी येतील, त्या सोडविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक पंधरा दिवसाला मी स्वत: आढावा घेणार असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यातील अनेक तरूण उद्योग-व्यवसाय करू इच्छितात. परंतु, भांडवल नसल्याने अडचणी येतात. येणाऱ्या काळात अशा तरूणांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोवरी प्रयत्न करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)