शालेय साहित्यात घुसली महागाई !
By Admin | Updated: June 9, 2014 00:09 IST2014-06-08T23:40:16+5:302014-06-09T00:09:24+5:30
परंडा : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास केवळ आठ दिवसाचा अवधी शिल्लक असून, शालेय साहित्याची दुकाने विविध प्रकारचे कंपास, रजीस्टर, वह्या आदींनी फुल्ल झाल्याचे दिसत आहे.

शालेय साहित्यात घुसली महागाई !
परंडा : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास केवळ आठ दिवसाचा अवधी शिल्लक असून, शालेय साहित्याची दुकाने विविध प्रकारचे कंपास, रजीस्टर, वह्या आदींनी फुल्ल झाल्याचे दिसत आहे. तसेच, काही पालकांनी आतापासूनच खरेदी सुरु केली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा शालेय साहित्याच्या किंमतीत सरासरी पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जून महिन्यासाठी पालकांना स्वतंत्र बजेट तयार करावे लागत आहे.
बाजारात नव्याने शालेय साहित्य दाखल झाले आहे. १६ जून रोजी शाळा उघणार असली तरीही पालक आतापासून शालेय साहित्याच्या खरेदीसाठी दुकानावर गर्दी करताना दिसत आहेत. अगोदरच महागाईने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले असून, त्यातच शालेय साहित्याच्या किंमतीतही वाढ झाल्याने पालक हैराण झाला आहे. परिणामी दुकानावर खरेदीसाठी आलेले पालक बरीच काटकसर करीत असल्याचेही जाणवत आहे.
कागदाच्या दरात वाढ
पुस्तक विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार साधारणत: तीन प्रकारात मिळणा-या कागदाचा किलोमागील दर वाढल्यामुळे वह्यांच्या किंमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २० रुपये (डझनप्रमाणे) वाढ झाली आहे. (वार्ताहर)
अशा आहेत किंमती
शालेय साहित्यगेल्यावर्षीचे दरयावर्षीचे दर
२०० पेजेस वह्या (डझन)१६० ते २७०१९० ते २९०
१०० पेजेस वह्या (डझन)९० ते १६०१२० ते १९२
कंपास पेटी४० ते २५०६० ते ३०० रुपये
कलर पेटी (१२ नग)११० ते १५०१२० ते १५०
कलर पेटी (१४ नग)१२० ते १६०१३० ते १६०
तिसरी, चौथीच्या पुस्तकाची प्रतीक्षा
इयत्ता तिसरी व चौथीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. शालेय साहित्याने बाजारपेठ सजली असली तरी त्यात तिसरीचे इतिहास, भूगोल व विज्ञान या विषयाची पुस्तके उपलब्ध नसल्याचे जितेंद्र जलाराम या विक्रेत्याने सांगितले. तसेच यंदा शालेय साहित्यामध्ये १५ टक्के वाढ झाली असून, नवीन शालेय साहित्य दुकानात येत आहे. साहित्य आयात करताना वाहतुकीवर मोठा खर्च होत आहे. त्यामुळेच यंदा शालेय साहित्याच्या किमती वाढल्या असल्याचेही जलाराम म्हणाले.