शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
5
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
6
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
7
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
8
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
9
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
10
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
11
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
12
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
13
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
14
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
15
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
16
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
17
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
18
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
19
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
20
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक

आठवडाभरात इंडिगोचे विमान तिसऱ्यांदा अचानक ‘जमिनीवर’; दिल्ली, मुंबई विमान रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:13 IST

विमानतळावरील डिजिडल बोर्डवर मुंबई आणि दिल्लीचे विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : इंडिगोचे विमान अचानक रद्द होण्याचा प्रकार सुरूच आहे. आठवडाभरात तिसऱ्यांदा, शुक्रवारी सायंकाळी उड्डाण घेणारे मुंबई आणि दिल्लीचे विमान रद्द झाले, तर शनिवारी सकाळचेही विमान रद्द करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशनल कारणांचा दाखला देत विमान रद्द करण्याचा प्रकार होत आहे. त्यात शुक्रवारी दिल्ली विमानतळावरील एटीसी सिस्टममधील बिघाडाचाही फटका प्रवाशांना बसला.

मुंबईचे विमान अचानक रद्द होण्याच्या प्रकारांमुळे प्रवासी त्रस्त होत आहेत. शुक्रवारी मुंबईसह दिल्लीचेही विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजनच बिघडले. विशेषत: मुंबई, दिल्लीवरून अन्य विमान असणाऱ्या प्रवाशांना याचा अधिक फटका बसला. विमान रद्द झाल्याची कल्पना देणारे मेसेज दुपारीच देण्यात आले. परंतु, त्यानंतरही काही प्रवासी विमानतळावर आले होते. स्थानिक इंडिगो प्रमुख अनिरुद्ध पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

कोणत्या दिवशी विमान रद्द ?- इंडिगोची मुंबई मार्गावर सकाळी आणि सायंकाळी विमानसेवा आहे.- १ नोव्हेंबर : रात्री ९:१५ वाजता मुंबईकडे जाणारे विमान रद्द.- ३ नोव्हेंबर : सकाळी ७:१० वाजता मुंबईकडे जाणारे विमान रद्द.- ७ नोव्हेंबर : सायंकाळी ७:१५ वाजता दिल्लीकडे जाणारे विमान रद्द- ७ नोव्हेंबर : रात्री ९:१५ वाजता मुंबईकडे जाणारे विमान रद्द.- ८ नोव्हेंबर : सकाळी ७:१० वाजता मुंबईकडे जाणारे विमान रद्द.

सेवा पूर्ववत होईल, ही अपेक्षाया आठवड्यात तिसऱ्यांदा इंडिगोची मुंबई - छत्रपती संभाजीनगर- मुंबई विमानसेवा रद्द करण्यात आली. वारंवार होणारे असे व्यत्यय निराशाजनक आहेत आणि प्रवाशांवर परिणाम करत आहेत. आशा आहे की, इंडिगो याची दखल घेईल आणि लवकरच सेवा पूर्ववत करेल. दिल्लीच्या विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) सिस्टीम बिघडली आहे, ज्यामुळे अनेक उड्डाणे विलंबित आणि रद्द झाली आहेत. शुक्रवारी सायंकाळचे इंडिगोचे मुंबई, दिल्ली विमान रद्द झाले. शनिवारी सकाळचे इंडिगोचे मुंबई विमानही रद्द करण्यात आले आहे.-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo Flights Grounded Again: Delhi, Mumbai Flights Cancelled Thrice Weekly

Web Summary : Indigo flights face disruptions. Mumbai and Delhi flights cancelled thrice this week due to operational reasons and ATC system failure. Passengers inconvenienced; service restoration expected.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरairplaneविमानtourismपर्यटन