शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल यांचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:50 IST

खोली पेटल्याने हॉटेलमध्ये राहण्यास गेले, कुटुंबाची पोलिसांना माहिती; पडल्याने दोन्ही हातांना गंभीर जखमा, तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल

छत्रपती संभाजीनगर : देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन किताब पटकावणारे तसेच माजी उपमहापौर लता दलाल यांचे पुत्र निकेत श्रीनिवास दलाल (४३) यांचा कार्तिकी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ८:३० वाजता ही धक्कादायक घटना घडली.

निकेत कुटुंबासह खडकेश्वर परिसरात राहत होते. शासनाच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत प्रकल्पात ते नोकरीला होते. कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री त्यांच्या घरात आगीची घटना घडली होती. त्यामुळे सामान जळून खोली राहण्यायोग्य नव्हती. परिणामी, निकेत रात्री हॉटेल कार्तिकी येथे राहण्यासाठी गेले. तिसऱ्या मजल्यावरील खाेली क्रमांक ३१७ मध्ये ते थांबले होते. सकाळी अचानक निकेत तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळले. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. क्रांती चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दिव्यांग असूनही खेळात तरबेजअंध असलेले निकेत खेळात तरबेज होते. जलतरणपटूसह ते उत्तम सायकलिंगदेखील करत होते. दुबईत फेब्रुवारी, २०२० मध्ये निकेत यांनी आयर्नमॅनचा किताब पटकावला होता. अशी कामगिरी करणारे ते भारताचे पहिले अंध आयर्नमॅन ठरले होते. आयर्नमॅन स्पर्धेची शर्यत ८ तास ३० मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक असताना निकेत यांनी केवळ ७ तास ४४ मिनिटांत पूर्ण करत सर्वांनाच अचंबित केले होते. निकेत दलाल यांनी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत जलतरणात पदक पटकावले होते. सायकलपटू असणाऱ्या निकेतने अनेक मॅरेथॉनमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. ते अभ्यासू स्पीच थेरेपिस्टदेखील होते.

दोन्ही हातांना गंभीर जखमाप्राथमिक शवविच्छेदन अहवालात निकेत यांचा एक हात तुटला असून दुसऱ्या हाताला गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या ते खाली कोसळून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तरीही शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल व सखोल तपासानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. दरम्यान, निकेत यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघातDeathमृत्यू