भारतीय बनावटीच्या वस्तुंना सोन्याचे दिवस!
By Admin | Updated: September 5, 2016 00:44 IST2016-09-05T00:34:28+5:302016-09-05T00:44:14+5:30
साबेर खान , जालना दररोज तंत्रज्ञानात संशोधन होत असून, लाईटिंग क्षेत्रही याला अपवाद ठरू शकले नाही. मध्यंतरी गणेशोत्सवात चिनी बनावटीच्या लाईटिंगला प्रचंड मागणी असायची.

भारतीय बनावटीच्या वस्तुंना सोन्याचे दिवस!
साबेर खान , जालना
दररोज तंत्रज्ञानात संशोधन होत असून, लाईटिंग क्षेत्रही याला अपवाद ठरू शकले नाही. मध्यंतरी गणेशोत्सवात चिनी बनावटीच्या लाईटिंगला प्रचंड मागणी असायची. त्यांचे आयुष्य मात्र फार नसायचे. केवळ आकर्षकता हाच मुद्दा होता. त्यानंतर एलईडीचे युग आले आणि भारतीय वस्तुंनी पुन्हा बाजारपेठ काबीज केली. सध्या बाजारात भारतीय बनावटीच्या एलईडी माळांना मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
गणपती, गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर मखर बनविण्यासाठी आकर्षक अशा एलईडी लाईटींगची खरेदी होत आहे. विविधरंगी संगीतबध्द असलेल्या या लाईटींगचे आकर्षण काही औरच असते. एलईडीमुळे जुन्या लाईटींगला मात्र उतरती कळा लागली आहे. कधीकाळी सणासुदीला अगोदरच लाईटींगची बुकींग करीत असत. मुक्त व्यापार धोरणाने चिनी बनावटीच्या एलईडी लाईटींगचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश झाला. ग्राहकांनीही या वस्तुंना पसंती दिली. परिणामी गीतांवर चालणाऱ्या डिस्को लाईटींगला आपला गाशा गुंडाळावा लागला. संगीत कारंज्यावरील भारतीय बनावटीच्या लाईटींगही इतिहासजमा होऊ लागल्या. सध्या जालना बाजारपेठेत इंदौर, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद येथून एलईडी लाटींगची खरेदी केली जात असल्याचे सांगण्यात आले. तर चिनी बनावटीच्या रईसमाला आता इतिहासजमा झाल्या आहेत.