शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खरंच, रस्ते फोडण्याची कटकट कायम बंद करणार; रस्त्याच्या कडेला एकच अंडरग्राऊंड पाईप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 13:30 IST

तोडफोड कायमची बंद करण्यासाठी रस्त्यांच्या शेजारी ‘मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेस वे’ टाकण्यासाठी महापालिकेने चाचपणी सुरू केली आहे.

औरंगाबाद : शहरात मागील काही वर्षांमध्ये २७४ कोटी रुपये खर्च करून प्रमुख रस्ते गुळगुळीत करण्यात आले. आणखी ५१७ कोटी रुपये खर्च करून अनेक रस्ते तयार करण्यात येणार आहेत. मात्र, अनेकदा रस्ते केबल टाकणे, गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी फाेडण्यात येतात. ही तोडफोड कायमची बंद करण्यासाठी रस्त्यांच्या शेजारी ‘मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेस वे’ टाकण्यासाठी महापालिकेने चाचपणी सुरू केली आहे. पंतप्रधान गतीशक्ती अभियानाअंतर्गत या प्रकल्पासाठी निधी मिळविता येईल का? यासाठी प्रयत्न सुरू असून, सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपये या प्रकल्पाचा अंदाजे खर्च असेल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

शहरात सध्या दोन प्रभागांत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांच्या कडेला खोदकाम केले जात आहे. तसेच मोबाईल कंपन्यांतर्फे शहरात फायबर ऑप्टिक केबल टाकण्यात येतात. त्यासाठी महापालिका संबधित कंपनीकडून पैसे घेते. पण, रस्त्यांचे झालेले नुकसान मोठे असते. रस्त्यांचे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेस वे’ची शहरात गरज आहे. मात्र, त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. पंतप्रधान गतीशक्ती अभियानाअंतर्गत यासाठी निधी मिळविता येईल का? यासाठी आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन) या जागतिक बँकेशी संलग्न असलेल्या संस्थेच्या प्रतिनिधीसोबत चर्चा झाल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. ही संस्था कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी महापालिकेला मदत करणार आहे.

८ जुलैला बैठकशहरात ‘मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेस वे’चे जाळे तयार करण्यासाठी मोठा निधी लागणार आहे. या अनुषंगाने ८ जुलैला ‘आयएफसी’च्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे पाण्डेय यांनी नमूद केले.

एकाच ठिकाणी काय?रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येणाऱ्या स्वतंत्र पाईपमध्ये ड्रेनेज, मोबाईल केबल, विद्युत केबल, जलवाहिन्या, गॅस पाईपलाईन, आदी मूलभूत सोयी सुविधांचे जाळे असेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका