शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरी, असुरक्षिततेमुळेच मतांचा टक्का वाढेना!

By admin | Updated: September 27, 2014 23:45 IST

बीड : मतदानयादीत नाव नोंदविण्यापासून ते मतदानाचा हक्क बजावण्यापर्यंत सामान्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते़ पन्नास ते साठ टक्के मते घेऊन निवडून

बीड : मतदानयादीत नाव नोंदविण्यापासून ते मतदानाचा हक्क बजावण्यापर्यंत सामान्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते़ पन्नास ते साठ टक्के मते घेऊन निवडून येणारे उमेदवार पाच वर्षे शंभर टक्के जनतेवर अधिराज्य गाजवतात़ हे थांबविण्यासाठी मतांचा टक्का वाढला पाहिजे़ गुंडगिरी व असुरक्षिततेमुळेच लोकशाहीने प्रदान केलेल्या सर्वोच्च अधिकाराचा वापर मतदार करत नाहीत, असा सूर ‘लोकमत’ आयोजित परिसंवादात शनिवारी उमटला़लोकमतच्या जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या परिसंवादासाठी यावेळी विषय होता मतदार जागृतीचा़ अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ अजित देशमुख, डॉ़ संजय वीर, प्रा़ हमराज ऊईके, ज्ञानदेव काशिद, पूजा जोशी, पूजा मागदे, धनश्री पुरी, सुषमा गोंडे यांनी सहभाग घेतला़मतदानजागृती ही चळवळ बनावीअण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचार निर्मूलन समितीने मतदान जागृतीसाठी नेहमीच प्रबोधन केले आहे़ लोकशाहीने सर्वसामान्यांना प्रदान केलेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येकाने केलाच पाहिजे़ मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर प्रशासनाने केवळ जनजागृती कार्यक्रम घेऊन चालणार नाही तर ही व्यापक चळवळ बनली पाहिजे़ सर्वसामान्यांपर्यंत मतदानाचे महत्त्व गेले पाहिजे़ मतदानाच्या दिवशी अनेकजण घरात बसणेच पसंत करतात़ राजकीय वर्तुळात गुंडांचा वाढता वावर व दबावतंत्र यामुळे अनेकजण मतदान केंद्राकडे फिरकत नाहीत़ त्यासाठी भयमुक्त व शांततापूर्ण वातावरण बनविणे गरजेचे आहे़ आम्ही ५० हजार पॉम्पलेटस् वाटणार आहोत़ पुस्तिकाही वाटल्या जाणार आहेत़ मतदान जागृतीसाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो, असेही अ‍ॅड़ देशमुख यांनी सांगितले़ मतदानाचा हक्क सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचा केला पाहिजे़ मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश हवा, इतके केले तरी मतदानाचा टक्का वाढेल असे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)