शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगरला वाढीव पाणी

By admin | Updated: May 25, 2014 01:30 IST

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरमधील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून ५ दशलक्ष घनमीटर पाणी घेण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरमधील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून ५ दशलक्ष घनमीटर पाणी घेण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. यासाठी जवळपास १० कोटी रुपये अनामत रक्कम एमआयडीसीकडे जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सिडको वाळूज महानगरवासीयांना आता एक दिवसाआड पाणी मिळेल. सध्या सिडको वाळूज महानगरमध्ये तीव्र पाणीटंचाई असून, आठवड्यातून दोन दिवस तेही अपुरे पाणी दिले जात आहे. सिडकोला पाणीपट्टीसह सेवाकर भरूनही सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे. सिडको प्रशासनाकडे स्वत:ची पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे त्यांना एमआयडीसीकडून शुल्क भरून पाणी घ्यावे लागते. भारनियमन तसेच इतर काही कारणांमुळे सिडकोचे जलकुंभ भरत नसल्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजनही सिडको प्रशासन करू शकत नाही. पर्यायाने नागरिकांच्या रोषाला सिडकोच्या अधिकार्‍यांना सतत तोंड द्यावे लागते. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे बोअर किंवा हातपंपाचे दूषित पाणी नागरिकांना वापरावे लागते. या पाण्यामुळे रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या प्रस्तावाला एमआयडीसीने मंजुरी दिली असून, यासाठी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी जवळपास १० कोटी ६० लाख रुपये अनामत रक्कम एमआयडीसीकडे जमा करण्यात येणार आहे. या वाढीव पाणीपुरवठ्यामुळे सिडकोला आता एक दिवसाआड पाणी पुरविणे शक्य होणार आहे, असेही केंद्रेकर म्हणाले. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नवाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वाढीव पाणीपुरवठ्यास वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिली आहे. अनामत रक्कम भरल्यावर सिडकोला रोज ५ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जाईल.सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याकडे रहिवाशांनी २३ मे रोजी तक्रारी करून नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. केंदे्रकर यांनी सध्या एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्यामुळे सिडको प्रशासनाने एमआयडीसीकडे ५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे सांगितले.लोकसंख्येच्या तुलनेत सिडकोकडून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणीटंचाई दूर करा, असे सतत सांगूनही दुर्लक्ष केले जाते. पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी सिडकोने प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. -मारुती गायकवाडसिडको प्रशासन सुविधा न देता भरमसाठ सेवाकर वसूल करते, त्यामुळे कामगार व भूखंडधारकांत असंतोष आहे. नियमित पाणी देण्याऐवजी सिडकोचे अधिकारी भूखंडधारकांची आश्वासनांवर बोळवण करतात. -नारायण हातोळे