शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ

By admin | Updated: September 2, 2014 01:54 IST

औरंगाबाद : मघापाठोपाठ निघालेल्या पूर्वा नक्षत्रातही जिल्ह्यात सर्वदूर वृष्टी होत आहे. त्यामुळे दुष्काळाचे संकट बऱ्यापैकी दूर झाले असून कन्नड तालुक्यातील गडदगड प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे

औरंगाबाद : मघापाठोपाठ निघालेल्या पूर्वा नक्षत्रातही जिल्ह्यात सर्वदूर वृष्टी होत आहे. त्यामुळे दुष्काळाचे संकट बऱ्यापैकी दूर झाले असून कन्नड तालुक्यातील गडदगड प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. पावसाने जिल्ह्यात पडझडीच्या अनेक घटना घडल्या असून नदी-नाले भरून वाहत आहेत.नागद परिसरात झालेल्या जोरदार पावसाने नागद येथील गडदगड मध्यम प्रकल्प तुडुंब भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. मागील वर्षीसुद्धा हा प्रकल्प आॅगस्ट महिन्यातच ओव्हर फ्लो झाला होता. सुरुवातीला पावसाळा एकदमच कमी प्रमाणात होता. जून महिन्यात फक्त ३० मि.मी., जुलै महिन्यात १३ मि.मी. पाऊस पडला होता. खरीप हंगाम हातचा गेला. आॅगस्ट महिन्यात १८५ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे नागद सर्कलमधील व परिसरातील आॅगस्ट महिन्यात १८५ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे नागद सर्कलमधील व परिसरातील छोटी-मोठी धरणे, पाझर तलाव तुडुंब भरून वाहत आहे. आतापर्यंत एकूण ३५० मि.मी. पाऊस पडला. गडदगड मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता के.जे. गोरे, पाणी वाटप संस्थांचे चेअरमन सुभाष महाजन, रमेश शिरा यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. लासूरगाव- पूर्वा नक्षत्राच्या पावसाने दमदार सुरुवात केली असून ३१ आॅगस्ट (रविवार)च्या मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यातील विक्रमी ५८ मि.मी. पाऊस एकाच दिवसात झाला. या तुफान पावसामुळे येथील रंगार टेकडीवरील पुरातन कालिका माता मंदिराच्या दक्षिणेकडील भिंत पूर्ण पडली आहे. त्यामुळे मंदिराचे बरेच नुकसान झाले आहे. १ सप्टेंबरपर्यंत ३६० मि.मी. पावसाची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात झाली आहे.चितेगाव-येथे झालेल्या भीजपावसाने भिंत कोसळून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. सोमवारी सकाळी ६ वाजता येथील रहिवासी लक्ष्मण वाघ यांच्या घराजवळील दगडी बांधकाम केलेली भिंत कोसळल्याने याखाली घरातील संसारोपयोगी वस्तूंचा चुराडा झाला. सकाळची वेळ असल्याने याठिकाणी नेहमी घरातील कुटुंबाच्या सदस्यांची ये-जा असते; परंतु यावेळी येथे कोणी व्यक्ती नसल्याने जीवित हानी टळली. घटनास्थळी तलाठी विमल बांगर, बबन साबळे यांनी पाहणी केली.घाटनांद्रा परिसरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील मक्याचे पीक भुईसपाट झाले आहे.मागील १० दिवसांपासून खरिपाच्या पिकास तुरळक कोसळणाऱ्या सरीमुळे जीवदान मिळाले होते. त्या पावसामुळे पिकाची वाढ देखील चांगल्या प्रकारे झाली होती; परंतु शनिवारच्या मुसळधार पावसाने पिकाचे नुकसान झाले. या भागातील तलावात ४० ते ५० टक्के पाणी साठा झाला.नांदर येथील बंधारा भरलासततच्या पावसाने पैठण तालुक्यातील नांदर येथील बंधारा पूर्ण भरला आहे. खोलीकरणानंतर पुढील काम न झाल्याने बंधाऱ्यातून पाणी वाया जात आहे. या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. त्यामुळे या बंधाऱ्याचे उर्वरित काम पूर्ण करावे, अशी मागणी सरपंच यशवंतराव काळे यांनी केली आहे. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)