छत्रपती संभाजीनगरकरांच्या हवाई सफरीत वाढ; वर्षभरात ९१ हजारांनी वाढले प्रवासी

By संतोष हिरेमठ | Updated: February 3, 2025 19:27 IST2025-02-03T19:26:22+5:302025-02-03T19:27:30+5:30

चिकलठाणा विमानतळावरून आजघडीला दिल्ली, मुंबई, हैदराबाद, गोवा, बंगळुरू, नागपूरसाठी विमानसेवा सुरू आहे.

Increase in air travel for Chhatrapati Sambhajinagarkar | छत्रपती संभाजीनगरकरांच्या हवाई सफरीत वाढ; वर्षभरात ९१ हजारांनी वाढले प्रवासी

छत्रपती संभाजीनगरकरांच्या हवाई सफरीत वाढ; वर्षभरात ९१ हजारांनी वाढले प्रवासी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांचीविमान प्रवासाची आवड वाढली आहे. कारण २०२४ मध्ये शहरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ६.९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, शहरातील विमान प्रवाशांमध्ये वर्षभरातच ९१ हजारांनी वाढ झाली आहे.

चिकलठाणा विमानतळावरून आजघडीला दिल्ली, मुंबई, हैदराबाद, गोवा, बंगळुरू, नागपूरसाठी विमानसेवा सुरू आहे. चिकलठाणा विमानतळावर गेल्या वर्षभरात प्रवाशांची गर्दी वाढली असून, महिन्यागणिक प्रवासी संख्येत मोठी वाढ दिसते. २०२४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक प्रवासी होते, तर सर्वाधिक ७१६ विमानांचे उड्डाणही याच महिन्यात नोंदले गेले. कार्गो वाहतुकीत मात्र ऑक्टोबर महिना ‘हिट’ ठरला.

२०२४ मधील विमान प्रवासी
महिना - विमान प्रवासी

जानेवारी – ५७,८२१
फेब्रुवारी – ५३,२९६
मार्च – ५४,८०२
एप्रिल – ५१,०५१
मे – ५८,४२१
जून – ५६,३८३
जुलै – ५३,९०६
ऑगस्ट – ५८,७९२
सप्टेंबर – ५८,४८६
ऑक्टोबर – ६२,९२२
नोव्हेंबर – ६६,२१७
डिसेंबर – ६३,०७७
एकूण प्रवासी संख्या – ६,९५,१७४

८२७.७ मेट्रिक टन कार्गो वाहतूक
विमानतळावरून २०२४ मध्ये ८२७.७ मेट्रिक टन मालाची (कार्गो) ने-आण झाली.

६ हजार विमानांचे उड्डाण
गेल्या वर्षभरात ६,७४१ विमानांचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण झाले.

२०२३ मध्ये एकूण प्रवासी : ६ लाख ३ हजार ४७३
२०२४ मध्ये विमान प्रवासी : ६ लाख ९५ हजार १७४

अहमदाबाद विमानसेवा बंदचा फटका
डिसेंबर २०२४ पासून अहमदाबाद विमानसेवा बंद झाली. त्यामुळे नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये विमान प्रवाशांमध्ये घसरण झाली.

नव्या विमानसेवेची गरज
नवीन विमानसेवेसाठी मोठी मागणी आहे. डिसेंबरमध्ये अहमदाबाद विमानसेवा बंद झाल्यामुळे २०२४ या वर्षात ७ लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा हुकला. विमानतळाच्या इतिहासात आतापर्यंत २०२४ मधील प्रवासी संख्या सर्वात जास्त, ६.९५ लाखांच्या घरात आहे. २०२४ या वर्षात २०२३ च्या तुलनेत प्रवासी वाहतुकीत १५.२% वाढ, विमान वाहतुकीत १८.५% वाढ, तर मालवाहतुकीत १३.५% वाढ झाली.
- अक्षय चाबूकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप.

Web Title: Increase in air travel for Chhatrapati Sambhajinagarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.