शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शहरात डायरियाच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 1:51 PM

महिनाभरात ८० रुग्ण 

ठळक मुद्देमहानगरपालिकेकडून व्यापक उपाययोजना केल्या जाताहेत

औरंगाबाद : पावसाळा सुरू होताच गॅस्ट्रो, डायरिया आदी आजारांचे प्रमाण वाढते. सध्या पावसाळा उशिराने सुरू झाला तरी मागील महिनाभरात डायरियाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आतापर्यंत मनपाच्या ३२ आरोग्य केंद्रांमध्ये ८० पेक्षा अधिक रुग्ण डायरियाचे आढळून आले. अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे डायरिया होण्याची शक्यता असते. उघड्यावरील अन्नपदार्थही याला कारणीभूत ठरू शकतात. डायरियाचे प्रमाण लक्षात घेऊन मनपाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

आ. सतीश चव्हाण यांनी सोमवारी सकाळी विधान परिषदेत महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीची माहिती आज देताना महापौरांनी नमूद केले की, पावसाळ्यात जागोजागी पाण्याची डबकी साचून त्याद्वारे डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात होऊन डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांत वाढ होऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून शहराच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही, यासाठी शहरभरात साथरोग डासांच्या नियंत्रणासाठी औषध फवारणी, धूर फवारणी, अ‍ॅबीट वाटप, साथरोगांपासून बचाव करण्यासाठी जनजागृतीची कामे नियोजन करून तात्काळ हाती घ्यावीत, अशी सूचना महापौरांनी केली. दरवर्षी औषध फवारणीविषयी अनेक वॉर्डांमधून तक्रारी येतात.

यंदा फवारणीची कामे प्रमाणिकपणे करा. यात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी तंबी महापौरांनी दिली. या बैठकीला आरोग्य सभापती गोकुळ मलके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, मलेरिया विभागप्रमुख अर्चना राणे, मनीषा भोंडवे, डॉ. मेघा जोगदंड, वडेरा आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

स्मार्ट सिटीतून सुविधा मनपाच्या काही रुग्णालयांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा नाहीत. आरोग्य केंद्रांत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, अनेक ठिकाणी तर स्वच्छतागृह नाहीत. स्ट्रेचर, व्हीलचेअरदेखील नाही. या आवश्यक सुविधा आता स्मार्ट सिटीतील स्मार्ट आरोग्य प्रकल्पांतर्गत २५ लाख रुपयांमधून पुरविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

चेतनानगर येथे आरोग्य केंद्रनॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत मंजूर झालेले आठपैकी हर्सूल-चेतनानगर येथील आरोग्य केंद्र लवकरच सुरू होणार आहे. पालिकेला अद्यापही सातारा-देवळाईत आरोग्य केंद्र उभारण्यासाठी जागा मिळालेली नाही. त्यामुळे भाडेतत्त्वावर जागा घेऊन येथे आरोग्य केंद्र सुरू करण्याची सूचना महापौरांनी केली.

टॅग्स :Medicalवैद्यकीयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल