८४ रुग्णांची वाढ
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:51+5:302020-12-04T04:12:51+5:30
८४ रुग्णांना सुटी : बीडमधील ९ वर्षीय मुलीचा मृत्यू, जिल्ह्यात ९९५ रुग्णांवर सुरू उपचार औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (दि.३) ...

८४ रुग्णांची वाढ
८४ रुग्णांना सुटी : बीडमधील ९ वर्षीय मुलीचा मृत्यू, जिल्ह्यात ९९५ रुग्णांवर सुरू उपचार
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (दि.३) दिवसभरात कोरोनाच्या ८४ नव्या रुग्णांची वाढ झाली. उपचार पूर्ण झालेल्या ८४ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील ३ आणि बीड येथील ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत रुग्णांची संख्या ४३,६५६ झाली आहे. यातील ४१,५०८ रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत, तर १,१५३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ९९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ८४ रुग्णांत मनपा हद्दीतील ६९, ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६९ आणि ग्रामीण १५, अशा ८४ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना शिवना येथील ५९ वर्षीय पुरुष, काझीवाडा येथील ५८ वर्षीय स्त्री, चिकलठाणा येथील हनुमान चौक येथील ७० वर्षीय पुरुष आणि बीड येथील ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
दर्गा चौक १, पुंडलिकनगर, गारखेडा २, आलोकनगर १, प्रतापनगर १, सातारा परिसर २, पोलीस लाईन १, चिकलठाणा १, मिलिटरी हॉस्पिटल १, माळीवाडा १, आकाशवाणी परिसर ६, एसआरपीएफ कॅम्प २, एन-९, रायगडनगर १, एन-८ येथे ६, एन-७ सिडको ३, हर्सूल १, चेतनानगर २, गवळीपुरा १, समर्थनगर १, एन-९, श्रीकृष्णनगर १, अमृतसाई सारा, कांचनवाडी १, गजानन कॉलनी १, कांचनवाडी, कल्याणगेट १, बीड बायपास १, दशमेशनगर १, ज्योतीनगर १, मुकुंदवाडी १, हनुमाननगर २, कामगार चौक १, पडेगाव १, बिल्डर सो., नंदनवन कॉलनी १, अन्य २२.
ग्रामीण भागातील रुग्ण
तीसगाव महानगर १, गांधेली १, चौका, फुलंब्री २, रांजणगाव २, पळसखेडा १, कुक्कडगाव १, बिडकीन १, अन्य ६.