शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पीआर कार्ड देण्यास अडवणूक

By admin | Updated: July 22, 2014 00:17 IST

संजय कुलकर्णी , जालना येथील तालुका नगरभूमापन कार्यालयात रितसर अर्ज करून पीआर कार्ड (आखीव पत्रिका) देण्याची मागणी केल्यानंतरही ते देण्यास टाळाटाळ होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने सोमवारी उघडकीस आणला.

संजय कुलकर्णी , जालनायेथील तालुका नगरभूमापन कार्यालयात रितसर अर्ज करून पीआर कार्ड (आखीव पत्रिका) देण्याची मागणी केल्यानंतरही ते देण्यास टाळाटाळ होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने सोमवारी उघडकीस आणला.शहरातील कुठल्याही जागेचे, घराचे पीआरकार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना प्रशासकीय इमारतीच्या आवारातील सेतू सुविधा केंद्रात अर्ज करावा लागतो. त्यासाठी २२ रुपये ५० पैसे शुल्क व अर्जाचे १० रुपये भरल्यानंतर पीआरकार्ड केव्हा मिळणार, याच्या तारखेसह पावती दिली जाते. सर्वसाधारणपणे तीन-चार दिवसांचा कालावधीची मुदत पीआरकार्ड देण्यासाठी घेतली जाते. चार दिवसानंतर परत सेतू सुविधा केंद्रात पीआरकार्ड च्या मागणीसाठी गेल्यानंतर ‘पीआरकार्ड येथे मिळत नाही, त्यासाठी नगरभूमापन कार्यालयात जा’ असे उत्तर या केंद्रातून देण्यात येते. १७ जुलै रोजी पीआरकार्ड मिळण्यासाठी सेतू केंद्रात अर्ज केल्यानंतर २१ तारखेला ते मिळेल, अशी पावती देण्यात आली. मात्र २१ जुलै रोजी या केंद्रात गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. त्यामुळे तालुका नगर भूमापन कार्यालयात गेल्यानंतर नगर भूमापक तेथे उपस्थित नव्हते. अन्य एका कर्मचाऱ्यास विचारणा केली असता, त्यांनी शेजारील कॅबीनकडे बोट दाखवून ‘तेथे मिळेल’ असे सांगितले. कॅबीनमधील कर्मचारी पीआरकार्ड देण्याचे काम करत होते.त्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी नंतर या, असे सांगितले. त्याचवेळी तेथील एका दलालांकडून १००-२०० रुपये द्या, पीआरकार्ड घेऊन जा, असे सांगण्यात आले. सुमारे १५-२० मिनिटांच्या अंतराने तेथे गेल्यानंतर संबंधित कर्मचारीही तेथे हजर नव्हते. याविषयी विचारणा केल्यानंतर लाईट नाही, संबंधित कर्मचाऱ्याची प्रकृती ठीक नाही, अशी उत्तरे देऊन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न झाला. सदर प्रकाराची चौकशी करणार - नायकयाबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यावर त्यांनी याबाबत चौकशी करू, असे सांगितले. सेतू सुविधा केंद्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या विभागाशीही संपर्क साधला असता, त्यांनी लेखी तक्रार देण्याचे सुचविले. सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करून पीआरकार्डची मागणी केल्यानंतर ते याच केंद्रात मिळत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पीआरकार्डची मागणी सेतू केंद्रात व ते मिळविण्यासाठी प्रत्यक्ष नगर भूमापन कार्यालयात जावे लागते. तेथे नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार होतो, अशा तक्रारीही काही जणांनी केल्या.