छत्रपती संभाजीनगर : एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ६ हजार देशी झाडांची लागवड करण्यात आली. ४ हजार चौरस मीटरवर ग्रीन लॉन लावली. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे काम अपूर्ण असल्याने लोकार्पण लांबणीवर पडले आहे.
एमजीएम परिसरात तब्बल १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुखांचे स्मारक व उद्यान उभारण्याचे काम २०१७ मध्ये सुरू झाले. ९ वर्षे होत आली तरी अजूनही काम अपूर्णच आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकल्पावर ३८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. सिव्हिल वर्कचे काम करणाऱ्या दिल्ली येथील कंत्राटदाराने कुर्मगतीने काम केले. कंत्राटदाराला वारंवार मुदत वाढवून दिली. मात्र, दंड करण्याचे धाडस प्रशासनाने दाखविले नाही.
शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचे कामही पूर्ण झालेले नाही. ५१ फूट उंचीचा पुतळा तयार करण्यासाठी क्ले मॉडेल तयार करून त्याचे सादरीकरण निवड समितीसमोर केले. पुतळा ब्राँझ धातूमध्ये तयार केला जाणार आहे. धुळे येथील सरमद क्रिएशन मार्फत पुतळ्याचे काम करण्यात येत आहे. स्मारकाच्या परिसरातील जागेत देशी जातीची ६ हजार झाडे लावण्यात आली आहेत. तसेच ४ हजार चौरस मीटरवर हिरवळ तयार करण्यात आली आहे.
उद्यानात शेततळेउद्यानातून वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले आहे. २ हजार स्क्वेअर मीटरमध्ये शेततळे तयार केले असून, त्या परिसरात फिरण्यासाठी ट्रॅक तयार करण्यात आला आहे. तसेच सिडको एन-५ येथील टाकीतून टँकर भरताना वाया जाणारे पाणी उद्यानात आणले आहे.
पाठपुरावा कमी पडू लागलास्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम, सुभाष देसाई यांनी २०२२ पर्यंत लक्ष घातले होते. स्वत: उद्धव ठाकरे यांनीही वारंवार स्मारकाला भेट देऊन पाहणी केली होती. २० जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर कामाकडे दुर्लक्ष झाले. अलीकडे उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी स्मारकाला भेटी देत सूचना केल्या होत्या.
Web Summary : The Balasaheb Thackeray memorial in Chhatrapati Sambhajinagar faces delays. Construction, ongoing since 2017 with ₹38 crore spent, is incomplete. Statue work remains unfinished, prolonging the inauguration despite landscaping efforts.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में बालासाहेब ठाकरे स्मारक में देरी हो रही है। 2017 से ₹38 करोड़ खर्च के साथ निर्माण अधूरा है। प्रतिमा का काम अधूरा रहने से भूनिर्माण प्रयासों के बावजूद उद्घाटन में देरी हो रही है।