शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात भाजपाचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 16:21 IST

काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेसव्याप्त भाजपा होतोय:उद्धव ठाकरे

गंगापुर (छत्रपती संभाजीनगर): केंद्रातील भाजप सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने देशातील विरोधी पक्षांना फोडण्याचे काम मोदी शहा करीत आहे कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे व ते भाजपच्या संपर्कात असल्याचे ऐकण्यात आले आहे त्यामुळे कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप पक्ष आज काँग्रेसव्याप्त होत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला तसेच भविष्यात भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल असे भाकीत केले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने येथील पंचायत समिती मैदानावर सोमवारी(१२)रोजी आयोजित जनसंवाद मेळवा प्रसंगी ते बोलत होते;यावेळी खासदार संजय राऊत,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,माजी खासदार चंद्रकांत खैरे,आमदार उदयसिंग राजपूत,गंगापुर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोनगावकर,उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील,तालुकाप्रमुख दिनेश मुथा,माजी जि.प.अध्यक्षा देवयानी पाटील डोनगावकर आदी हजर होते.निवडणूक आयोगाने शिवसेना,राष्ट्रवादी पक्ष चोरांच्या हातात दिली आता अशोक चव्हाणांच्या निमित्ताने काँग्रेस पण देणार का ? असा जाहीर सवाल सभेतून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. 

देशात सगळीकडे एकाधिकारशाही दिसून येत असून दहा वर्षात भाजपा सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्ती केली नाही भाववाढ, महागाईने जनता त्रस्त आहेत मात्र केंद्रातले सरकार स्वार्थी वृत्तीने विरोधी पक्षांना फोडण्यात गुंग आहे भाजपाने मतांचा बाजार लावला असून विरोधी पक्षाच्या फोडाफोडीने स्व: पक्षातील निष्ठावंतावर अन्याय होत आहे हे देखील भाजप विसरत आहे तसेच या निर्दयी सरकारला देशातील शेतकरी व त्यांच्या आत्महत्यांकडे पहायला वेळ नाहीत,शेतीमालाचे भाव सातत्याने घसरत असून बळीराजा कर्जबाजारी होत आहेत मोदी सरकारमध्ये हिंमत असेल तर संपूर्ण देशात निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करावी असे आव्हान ठाकरे यांनी केंद्रातील सरकारला केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाcongressकाँग्रेस