शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट

By विकास राऊत | Updated: April 22, 2023 12:54 IST

विभागीय प्रशासनाने शासनाकडे १०० कोटींची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सुमारे ५ हजार ३११ गावांवर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असल्याने विभागीय प्रशासनाने शासनाकडे १०० कोटींची मागणी केली आहे. यामध्ये पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, पाणीपुरवठा योजना दुरुस्तींसह इतर खर्चाचा समावेश आहे. मे ते जुलैअखेरपर्यंत विभागात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता आहे. ५० कोटी टँकर व विहीर अधिग्रहणासाठी, तर उर्वरित ५० कोटी पाणीपुरवठा योजनांसाठी लागणार आहेत.

गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि त्यानंतर सध्या अवकाळी पावसाचा फटका विभागाला बसतो आहे. त्यातच ‘अल्-निनो’च्या प्रभावामुळे विभागावर पाणीटंचाईचे संकट आल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात पाणीटंचाई समोर ठेवून विभागीय प्रशासनाने १०० कोटींचा विशेष टंचाई कृती आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला आहे. मे मध्यान्ह नंतर जून आणि जुलै महिन्यात ५ हजार ३११ गावं, वाड्यांवर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

९०० टँकर, ३४७१ विहिरींचे अधिग्रहण...मराठवाड्यात पुढील अडीच ते तीन महिन्यांसाठी ९०० टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता आहे. तसेच ३ हजार ४७१ विहिरी, खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागेल. असे आठही जिल्ह्यांतून आलेल्या मागणी अहवालात नमूद आहे.

पाणीपुरवठा करण्यासाठी संभाव्य खर्च असाजिल्हा-------------गावे----- -------निधीची मागणीछत्रपती संभाजीनगर--- २४३---- ----- ५ कोटी रुपयेनांदेड -----------१३४३------- ------ १० कोटी रुपयेधाराशिव--------- ९४१ --------------९ कोटी रुपयेजालना --------७३८---------------- ४ कोटी रुपयेबीड ---------६४१------------३ कोटी रुपयेहिंगोली-------५२४------------७ कोटी रुपयेलातूर-------७०५ ----------९ कोटी रुपयेपरभणी------१७६----------३ कोटी रुपयेएकूण-------५३११--------५० कोटी रुपये

अहवाल शासनाकडे पाठविला आहेविशेष टंचाई आराखडा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. विभागातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या खर्चाचा त्यात समावेश आहे.- पराग सोमण, विभागीय महसूल उपायुक्त

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद