शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

मराठवाड्यात ‘अवयवदानाचे काम, सरकारी रुग्णालयांत थोडं थांब’ची अवस्था

By संतोष हिरेमठ | Updated: August 13, 2025 13:15 IST

जागतिक अवयवदान दिन विशेष : मराठवाड्यातील सरकारी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण कधी?

छत्रपती संभाजीनगर : एका ब्रेनडेड रुग्णाच्या अवयवदानाने ८ जणांना नवीन आयुष्य मिळते. अवयवदानाविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सरकारी रुग्णालये आघाडीवर आहेत. मात्र, प्रत्यक्षात अवयवदानानंतर होणाऱ्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मराठवाड्यातील सरकारी रुग्णालयांत होतच नाहीत. सरकारी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण होणार कधी, असा सवाल गोरगरीब रुग्ण विचारत आहेत.

दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन असतो. यानिमित्त सरकारकडून अवयवदान जनजागृती होतेय. मराठवाड्यात ६ नॉन-ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रॅव्हल सेंटर (एनटीओआरसी) आहेत. हे सेंटर केवळ ब्रेनडेड रुग्णांचे अवयव काढून प्रत्यारोपण होणाऱ्या रुग्णालयात पाठवू शकतात. यात मराठवाड्यातील ५ सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात फेब्रुवारी २०१६ आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये घाटीत अवयवदान झाले; परंतु त्यानंतर झालेच नाही. दुसरीकडे मराठवाड्यातील १३ खासगी रुग्णालयांच्या भरवशावरच अवयवदान सुरू असून, सरकारी रुग्णालयांत मात्र प्रतीक्षाच आहे.

खासगी रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपणाचा खर्च- किडनी प्रत्यारोपण : ४.५ लाख ते ७ लाख रु.- लिव्हर प्रत्यारोपण : २० ते २५ लाख रु.- हृदय प्रत्यारोपण : २० ते ३५ लाख रु.- कॉर्निया प्रत्यारोपण : ५० हजार ते १ लाख रु.

मराठवाड्यातील स्थिती- मराठवाड्यात अवयव प्रत्यारोपण करणारी सर्व १३ रुग्णालये ही खासगी रुग्णालये- अवयव काढून प्रत्यारोपणासाठी पाठविणारे सेंटर असलेली ५ सरकारी रुग्णालये.- ९ वर्षांत ४२ ब्रेनडेड व्यक्तींचे अवयवदान

मराठवाड्यात झालेले अवयवदान- हृदय-१५- लिव्हर-३५- किडनी-७९- फुप्फुस-२- नेत्र-४६

प्रत्यारोपणासाठी प्रयत्नशीललोकांनी अवयवदानासाठी पुढे आले पाहिजे. घाटीत किडनी प्रत्यारोपणाच्या दृष्टीने डाॅक्टर्स आणि पायाभूत सुविधा आहेत. तंत्रज्ञांसह अन्य काही सुविधांची प्रतीक्षा आहे. यासाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच किडनी प्रत्यारोपण सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी

गरजूंची संख्या अधिकएका व्यक्तीच्या अवयवदानाने आठ जणांचे जीव वाचवू शकतात. दुर्दैवाने दात्यांच्या संख्येपेक्षा अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अवयवदान कायदेशीर, नैतिक आणि सर्व प्रमुख धर्मांनी समर्थित आहे.- सय्यद फरहान हाशमी, मुख्य प्रत्यारोपण समन्वयक, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर

‘एनटीओआरसी’साठी अर्ज‘एनटीओआरसी’साठी अर्ज करण्यात येत आहेत. परवानगी मिळताच आपल्याकडेही ब्रेनडेड रुग्णाचे अवयव काढण्याची प्रक्रिया शक्य होईल. अवयवदानासाठी नागरिकांनी पुढे यावे.- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Organ donationअवयव दानchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी