शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बालकांना शिक्षणाची ओळख करून देणाऱ्या ६०० अंगणवाड्या भरतात समाज मंदिरात!

By विजय सरवदे | Updated: June 20, 2023 12:54 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने बांधकाम निधी गोठवला; स्वतःच्या इमारतीचे स्वप्न अंधकारमय

छत्रपती संभाजीनगर : देशातील पहिली ‘आयएसओ’ अंगणवाडी होण्याचा मानही औरंगाबाद जिल्ह्याला मिळाला होता. मात्र, शासनाने यंदापासून अंगणवाडी इमारत बांधकामाचा निधीच गोठवला असल्यामुळे या जिल्ह्यातील सुमारे ६०० अंगणवाड्यांचे स्वतःच्या इमारतीत संसार थाटण्याचे स्वप्न अंधकारमय झाले आहे. 

ग्रामीण भागातील बालकांचे लसीकरण, त्यांना पूर्व प्राथमिक शालेय शिक्षणाचे धडे गिरवता यावेत, तसेच कुपोषित बालके, स्तनदा माता, गरोदर माता यांना पोषण आहार देण्याचे केंद्र म्हणून अंगणवाड्यांकडे बघितले जाते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली साडेतीन हजार अंगणवाड्या कार्यरत होत्या. यापैकी २७०० ते २८०० अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत आहेत, तर उर्वरित अंगणवाड्या समाज मंदिर, ग्रामपंचायतीच्या खोलीत, तर कुठे जि.प. शाळांमध्ये चालतात. त्यांना स्वत:ची इमारत मिळाल्यास बालकांना स्वच्छंदपणे बागडणे, पूर्व प्राथमिक शालेय शिक्षणाचे धडे गिरवणे, महिला, किशोरी मुलींना स्वच्छतागृहाच्या सुविधा देता येतात. 

त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमार्फत टप्प्याटप्प्याने दरवर्षी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी जवळपास १० कोटींचा निधी दिला जायचा. आता या वर्षापासून शासनाने हा निधी देणेच बंद केले आहे. त्यामुळे जवळपास ६०० अंगणवाड्यांना आता हक्काचे छत मिळणे दुरापास्त झाले आहे. दुसरीकडे, ७८ अंगणवाड्या फुलंब्री, सोयगाव नगरपंचायत आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडे वर्ग झाल्या आहेत, हे विशेष!

इमारत बांधकामासाठी पुरेसा निधी नाही जिल्हा नियोजन समितीने २०२१-२२ मध्ये ७२, २०२२-२३ मध्ये ५० अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी १०-१० कोटींचा निधी दिला. त्यातून ७२ पैकी ६९ इमारतींचे काम प्रगतिपथावर आहे, तर ५० अंगणवाडी इमारत बांधकामाची प्रक्रिया निविदा स्तरावर आहे. ११.२५ लाख रुपये खर्चून एक इमारत उभारली जाते. आता जि.प. महिला व बालविकास विभाग तसेच राज्य शासनाच्या अखत्यारीत महिला व बालविकास विभाग या दोघांना मिळून जिल्हा नियोजन समितीच्या एकूण बजेटच्या ३ टक्के एवढा निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडी इमारत बांधकामासाठी पुरेसा निधी खर्च करता येणार नाही, असे कार्यालयीन सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद