केंद्रीय शहरी विकास समितीवर इम्तियाज जलील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:06 IST2020-10-08T14:06:16+5:302020-10-08T14:06:57+5:30
खा. इम्तियाज जलील यांना शहरी विकासविषयक केंद्र सरकारच्या स्थायी समितीत दुसऱ्या वर्षासाठी नामांकन देण्यात आले आहे.

केंद्रीय शहरी विकास समितीवर इम्तियाज जलील
औरंगाबाद : खा. इम्तियाज जलील यांना शहरी विकासविषयक केंद्र सरकारच्या स्थायी समितीत दुसऱ्या वर्षासाठी नामांकन देण्यात आले आहे. शहरी बाबींशी संबंधित निर्णय घेण्यात समितीला महत्त्व आहे.
खासदारपदाच्या पहिल्या वर्षात जलील यांना नागरी उड्डाण समिती आणि नागरी उड्डाण समितीची केंद्रीय समिती अशा दोन महत्त्वपूर्ण समित्यांवर उमेदवारी देण्यात आली होती. समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो. त्यानंतर सदस्यांची नेमणूक इतर समित्यांवर केली जाते. नुकत्याचा पार पडलेल्या लोकसभेच्या अधिवेशनात जलील यांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी सभापतींना नगरविकास समितीमध्ये आणखी एक वर्ष मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली होती. जेणेकरून औरंगाबादेतील पाणीपुरवठा, स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतील. शहरी परिवहन आणि स्मार्ट सिटी प्रकल्प हे सर्व यूडी समितीच्या कार्यक्षेत्रात येतात.