Imtiaz Jaleel: '...तर वाईनची दुकाने फोडणार'; खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:23 IST2022-01-31T15:23:32+5:302022-01-31T15:23:54+5:30
राज्य सरकारने किराणा दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, पण या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे.

Imtiaz Jaleel: '...तर वाईनची दुकाने फोडणार'; खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
औरंगाबाद: काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने राज्यातील किराणा दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये वाईन (Wine) विक्रीस परवानगी दिली आहे. पण, या निर्णयाचा भाजपसह MIM ने विरोध केला आहे. औरंगाबादचे MIMचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या निर्णयाला विरोध केला असून, तीव्र शब्दात सरकारला इशारा दिला आहे.
मीडियाशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यातील कुठल्याही दुकानात वाईन विकू देणार नाही. अशा दुकानांचे शिवसेनेच्या नेत्यांनी उद्घाटन करावे, ती दुकाने आम्ही फोडून काढू, असे खुले आव्हानच सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पण, शेतकऱ्यांना प्रोत्साहनच द्यायचे झाल्यास, वाईनऐवजी दूध आणि शेतीसंबंधी गोष्टींना महत्वा द्वाये, असेही जलील म्हणाले. राज्य शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा एमआयएमच्या कार्यकर्त्ये जिथे कुठे सुपरमार्केटमध्ये वाईनची दुकाने दिसतील ते तात्काळ फोडतील, असा इशारा जलील यांनी दिला आहे.