शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लॉकडाऊनच्या प्रत्येक टप्प्यात सुधारली हवेची गुणवत्ता; घातक वायूंच्या प्रमाणात प्रचंड घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:01 IST

संस्थेच्या अहवालानुसार लॉकडाऊनपूर्वी शहरातील पीएम २.५ या कणांचे प्रमाण ४७. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे प्रमाण १३.८ एवढे खाली आले आहे.

ठळक मुद्देवायुप्रदूषणावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन या संस्थेचा अहवाल लॉकडाऊनच्या आधीच्या ३० दिवसांमधील हवेतील घातक वायूंचे प्रमाण आणि त्यानंतरचे टप्पे

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : लॉकडाऊनचा उपयोग कोरोना महामारी रोखण्यासाठी किती झाला, हे माहीत नाही. मात्र, यामुळे हवेची गुणवत्ता कमालीची सुधारत गेली आणि प्रत्येकालाच एक आरोग्यदायी मोकळा श्वास घेता आला. लॉकडाऊनदरम्यान शहराच्या हवेची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे, असे वायुप्रदूषणावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन या संस्थेने दिलेल्या अहवालावरून स्पष्ट दिसून येते.

लॉकडाऊनच्या आधीच्या ३० दिवसांमधील हवेतील घातक वायूंचे प्रमाण आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या प्रत्येक टप्प्यात घातक वायूंच्या प्रमाणात सातत्याने होत असलेली घट याविषयीचा अभ्यास या संस्थेतर्फे करण्यात आला आहे. पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, मुंबई या शहरांप्रमाणे औरंगाबादचा समावेश १२२ नॉन-अटेनमेंट शहरांमध्ये म्हणजेच नॅशनल एम्बियंट एअर क्वॉलिटी स्टँडर्डस्च्या पातळीपर्यंत पोहोचू न शकलेल्या शहरांच्या यादीमध्ये होतो. या शहरांमधील प्रदूषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याची गरज आहे.

संस्थेच्या अहवालानुसार लॉकडाऊनपूर्वी शहरातील पीएम २.५ या कणांचे प्रमाण ४७. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे प्रमाण १३.८ एवढे खाली आले आहे. पीएम २.५ म्हणजे हवेतील अतिसूक्ष्म धूलिकण होय. या धूलिकणांची पातळी ४० पेक्षा कमी असणे गरजचे आहे. लॉकडाऊनपूर्वी सल्फर डायआॅक्साईडचे प्रमाण ७.७ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. ते लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ६.२ झाले आहे. डोळ्यांची जळजळ, नाक, घशाचे आजार व श्वसनाचे विकार प्रामुख्याने सल्फर डायआॅक्साईडमुळे होणाऱ्या प्रदूषणाने होतात. 

लॉकडाऊनपूर्वी नायट्रस डायआॅक्साईडचे प्रमाण १९. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. ते आता १७.६ पर्यंत कमी झाले आहे. थरथर कापणे, मळमळ, उलट्या, असे दुष्परिणाम या वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे होतात. पीएम १० चे प्रमाण लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात निम्म्यावर आले आहे. ८१.३ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटरवरून ते प्रमाण ४३.२ एवढे झाले आहे. पीएम १० म्हणजे १० मायक्रो मीटर आणि त्यापेक्षा लहान व्यासाचे धूलिकण. हे धूलिकण अतिसूक्ष्म असल्याने ते थेट रक्तात किंवा फुफ्फुसामध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळे विविध आजार उद्भवू शकतात. अतिविषारी समजल्या जाणाऱ्या कार्बन मोनोक्साईडच्या प्रमाणात ६५०.१ वरून ४९८.९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढी घट झाली आहे, तर ओझोनचे प्रमाण ३६.४ वरून ५०.४ पर्यंत वाढले आहे. 

प्रदुषणमुक्त हवा राहावीपर्यावरण कार्यकर्ती रिधिमा पांडे हिच्या ‘साल भर ६०’ या डिजिटल उपक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या अनेक शहरांतील रहिवासी स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत. लॉकडाऊनच्या ६० दिवसांमध्ये जशी प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी हवा होती, तशीच हवा वर्षभर राहावी, या मागणीसाठी ही मोहीम सुरू झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या ६० मायक्रोग्रॅम्स पर क्युबिक मीटर या सुरक्षित पातळीनुसार (२४ तासांसाठी) शहरातील प्रदूषणाचा स्तर नियंत्रित राहावा, यासाठी योग्य उपाययोजना राबवल्या जाण्याची खातरजमा सरकारने करावी, अशी मागणी या मोहिमेतून करण्यात आली आहे.

 

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण