अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 19:12 IST2019-01-23T19:11:42+5:302019-01-23T19:12:36+5:30
सन २०१५ मध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दांडगे आणि तडवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना कारावासाची शिक्षा
अजिंठा (औरंगाबाद ) : तीन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षां कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. गणेश संतोष दांडगे व बबलू अजीज तडवी ( रा जळकी बाजार ता सिल्लोड ) असे आरोपींची नावे आहेत.
सन २०१५ मध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दांडगे आणि तडवी विरुद्ध भादवी ३५४(ड) व ११,१२ पोस्को नुसार अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सपोनि शंकर शिंदे यांनी तपास करून जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप दाखल केले होते. जिल्हा सत्र न्यायाधीश एस.डी.दिग्रसकर यांनी
आज (दि.२३) दिलेल्या निकालात आरोपींना १ वर्ष कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती बीट जमादार पोना दत्तात्रय मोरे यांनी दिली. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. अरविंद बागुल यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ एस.बी.भेरे,पोना एस.आर.दिलवाले यांनी काम पाहिले.