शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

महत्वपूर्ण संचिका धोक्यात

By admin | Updated: July 26, 2014 00:42 IST

चंद्रकांत देवणे, वसमत तालुक्याचे सर्व दप्तर व सर्व शेतकऱ्यांची कुंडली असलेले तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील दप्तर रामभरोसेच आहे.

चंद्रकांत देवणे, वसमततालुक्याचे सर्व दप्तर व सर्व शेतकऱ्यांची कुंडली असलेले तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील दप्तर रामभरोसेच आहे. जर आग लागली तर आग विझविण्याची कोणतीही व्यवस्था या कार्यालयात नाही. या कार्यालयासह नव्याने बांधलेल्या तहसील व उपविभागीय कार्यालयातही अद्यापही यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले.वसमत शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील आग प्रतिबंधक उपाय योजनांचा गुरूवारी आढावा घेतला असता खासगी बँका वगळता इतर शासकीय कार्यालयात आगरोधक यंत्रणाच नसल्याचे पहावयास मिळाले. शहरातील हैदराबाद बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, नगर पालिका या कार्यालयात आग प्रतिबंधक यंत्रणा पहावयास मिळाली. खाजगी कार्यालयात ही यंत्रणा उपलब्ध आहे. शहरातील खाजगी कार्यालयात मात्र ही यंत्रणा पहावयास मिळाली नाही.वसमत शहराच्या भर बाजारात तालुका भूमीलेख कार्यालय आहे. २००६ पासून हे कार्यालय या इमारतीत सुरू आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे व तालुक्याची सर्व कुंडली कागदपत्राच्या निमित्ताने या कार्यालयात जतन केली आहे. कार्यालयाच्या दप्तररुममध्ये कापडी गठ्ठ्यात कागदपत्रे बांधून ठेवलेली आहेत. मात्र या कागदपत्रांची सुरक्षा व्यवस्था मात्र काहीही नाही. जर आग लागली तर आग विझविण्याचीही कोणतीही यंत्रणा नाही. नगरपालिकेचा अग्निशमन बंब येईपर्यंत कागदपत्रे आगीपासून शाबूत राहावीत यासाठी राम नामाचा जपच करावा लागेल, अशी अवस्था आहे. रेकॉर्डरुममध्ये लाईट फिटींगही उघडी आहे. शॉर्टसर्कीटमुळे कधीही दुर्घटना होवू शकते. आजवर काही झाले नाही हे नशीब. परंतु भविष्यात जर साधी ठिणगीही पडली तर रेकॉर्ड सांभाळणेही अवघड होणार आहे.या संदर्भात तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक देशमुख यांच्याशी चर्चा केली असता, आग विझविण्यासाठीचे यंत्र शासनाकडूनच सर्व कार्यालयांना दिले जाते. वसमतच्या कार्यालयाला अद्याप ही यंत्रसामुग्री मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले.वसमत येथे नव्याने तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या आहेत. या कार्यालयातही महत्वाचे दस्तावेज व कागदपत्र रेकॉर्ड रुममध्ये असतात. मात्र या दोन्ही कार्यालयातही आगरोधक यंत्रणाच नाही. या संदर्भात तहसीलदार अरविंद नरसीकर यांच्याशी संपर्क साधला असता, रेकॉर्ड रुमसाठी आगरोधक यंत्रणा आवश्यक आहे. तशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे. लवकरच ही यंत्रणा प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसमत येथील रेकॉर्ड रुमचे उद्घाटन पंधरा दिवसापूर्वीच विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्तांनीही रेकॉर्ड रुमसाठी आगरोधक यंत्रणा तातडीने बसवून घेण्याची सूचना केली होती. (वार्ताहर)सुरक्षितता वाऱ्यावर वसमत तालुक्याचे सर्व दप्तर व शेतकऱ्यांची कुंडली असलेले तालुका भूमिअभिलेख कार्यालय रामभरोसेच आहे. आग लागली तर आग विझविण्याची कोणतीही व्यवस्था या कार्यालयात नाही. नव्याने बांधलेल्या तहसील व उपविभागीय कार्यालयातही अग्निशामक यंत्रणा नाही. वसमत शहरातील हैदराबाद बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, नगरपालिका या कार्यालयात आग प्रतिबंधक यंत्रणा पहावयास मिळाली. वसमत शहराच्या भर बाजारात तालुका भूमीलेख कार्यालय आहे. २००६ पासून हे कार्यालय या इमारतीत आहे. कार्यालयाच्या दप्तर रुममध्ये कापडी गठ्ठ्यात कागदपत्रे बांधून ठेवलेली आहेत. मात्र या कागदपत्रांची सुरक्षा व्यवस्था मात्र काहीही नाही. जर आग लागली तर आग विझविण्याचीही कोणतीही यंत्रणा नाही. विभागीय आयुक्तांनीही आगरोधक यंत्रणा तातडीने बसवून घेण्याची सूचना केली होती.