शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"मी तुझ्या बापाच्या वयाचा"; चंद्रकांत खैरे व्हायरल फोटोवरून नितेश राणेंवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:18 IST

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो आणि 'विराट सभेचा formula ?' असे ट्विट करत शिवसेनेच्या सभेवर निशाना साधला

औरंगाबाद: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो 'विराट सभेचा formula ?' असे ट्विट करत बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी पैसे वाटल्याचा आरोप केला. यावर माजी खासदार खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून भाजपच्या लोकांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. तर नितेश राणे खोटारडा आहे, मी त्याच्या बापाच्या वयाचा आहे, असेही खैरे यांनी यावेळी ठणकावले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या सभेनंतर शिवसेनेने त्याच मैदानावर विक्रमी सभा घेण्याच्या जाहीर केले होते. दरम्यान, शहरातील पाणी प्रश्नावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने शिवसेना विरोधात मोर्चा काढला. यामुळे बुधवारी ८ जून रोजी मराठवाड्यात औरंगाबाद येथील पहिल्या शिवसेना शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सभेची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शहरात भरगच्च सभा झाली. शिवसेनेने ही सभा विक्रमी झाली असून आम्ही स्वतःचाच विक्रम मोडला असल्याचे दावा केला. सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणातून केलेली चौफेर फटकेबाजीची चर्चा सुरु असतानाच भाजपने सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवली असा आरोप केला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो आणि 'विराट सभेचा formula ?' असे ट्विट करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे नागरिकांना पैसे वाटत असल्याचा दावा केला. यावर खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले. मी नितेश राणेच्या बापाच्या वयाचा आहे, तो आणि  भाजप खोटारडे असून ते कधीच सत्तेत येणार नाहीत, असा संताप खैरे यांनी व्यक्त केला. 

मनसेने देखील केला पैसे वाटल्याचा दावादरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर मनसेच्या नेत्यांनी टिका करायला सुरुवात केली आहे. सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे. तर, सभेच्या गर्दीवरुन मनचिसेच्या अमेय खोपकर यांनी निशाणा साधला आहे. 'हिंदुंचा खरा नेता म्हणजे फक्त आणि फक्त राज ठाकरे. मुख्यमंत्री यांची सभा बघा, मागे सर्व खुर्च्या आणि उभा राहायला जागाचं जागा, सभा सुरू असताना लोक घराकडे रवाना, नाद करायचा पण मनसेचा नाही, जय हिंदुराष्ट्र ! असे म्हणत खोपकर यांनी सभेला गर्दी कमी होती, असे म्हटलं आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेMNSमनसेNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाAurangabadऔरंगाबाद