समृद्धी महामार्गाचा अवैध वापर अंगलट; खोतकर समर्थकांच्या गाड्यांचा दौलताबादजवळ अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 20:04 IST2022-10-04T20:00:54+5:302022-10-04T20:04:50+5:30
दरम्यान यात गाड्यातील १५ कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे.

समृद्धी महामार्गाचा अवैध वापर अंगलट; खोतकर समर्थकांच्या गाड्यांचा दौलताबादजवळ अपघात
औरंगाबाद: जालना येथील शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांचा ताफा थेट समृद्धी महामार्गांवरून बीकेसीवरील दसरा मेळाव्यासाठी निघाला आहे. मात्र, औरंगाबाद जवळील दौलताबाद येथे या ताफ्यातील दहा वाहने एकमेकांना धडकाल्याची माहिती आहे. या वाहनांवर अर्जून खोतकर यांच्या नावाची स्टीकर आहेत. दरम्यान यात १५ कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी येथे उद्या दसरा मेळावा होत आहे. यासाठी मराठवाड्यातून मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. दरम्यान, जालना येथून अर्जुन खोतकर समर्थक थेट समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे आज दुपारी रवाना झाली. यातच ताफा दौलताबाद जवळ आला असता अचानक दहा वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, जीवितहानी आणि जखमी झाल्याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
मात्र, परवानगी नसताना खोतकर समर्थक या महामार्गावरून रवाना झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावर टीका केला आहे. तसेच विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा सत्तेचा गैरवापर असून परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.