छत्रपती संभाजीनगर : दोन मुलींपाठोपाठ तिसरी मुलगी नको म्हणून कुटुंबाने गर्भपात करणाऱ्या टोळीकडून घरातच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भवतीचे गर्भलिंगनिदान केले. त्यानंतर गोळ्यांद्वारे गर्भपात होत नसल्याने घरातच शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली. मात्र, वेळीच ही बाब कळल्यानंतर तिच्या वडिलांनी धाव घेतली, तेव्हा विवाहितेचा पती, सासरकडील कुटुंब, गर्भपात करण्यासाठी घरी गेलेल्या कमल गोकुळ तीनगोटे व तिच्या साथीदारांनी मागील दाराने पोबारा केला होता.
२६ वर्षीय विवाहिता नारेगावमध्ये वास्तव्यास आहे. तिला पहिली मुलगी झाल्याने माहेरी पाठवले होते. दुसऱ्यांदा मुलगीच झाली म्हणून पती तिला रुग्णालयातच सोडून निघून गेला होता. नातेवाईकांच्या मध्यस्थीने विवाहिता पुन्हा पतीकडे नांदण्यास गेली होती. मुलगा हवा या हट्टापायी विवाहिता तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. पाच महिन्यांची गर्भवती असताना २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तिच्या पतीने दोन पुरुष व एका महिलेला घरी नेले. त्यांच्याकडे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन होते. विवाहितेने गर्भलिंग निदानास तीव्र विरोध केला. मात्र, तिला मारहाण करून चाचणी करण्यात आली.
६ मार्च रोजी घरातच शस्त्रक्रियेचे नियोजनचाचणीत मुलगीच असल्याचे गर्भपात करणाऱ्या टोळीने कुटुंबाला सांगितले. ६ मार्च रोजी घरातच गर्भपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. टोळीने अधिकचे शुल्क आकारले. ही टोळी त्यांच्या घरी पोहोचली. तेव्हा त्यातील एका महिलेने तिचे नाव कमल तीनगोटे सांगून ती जालन्याची रहिवासी असल्याचे सांगितले. विवाहितेने तिला गर्भपात न करण्यासाठी विनवण्या केल्या. मात्र, हात पकडून तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यादरम्यान विवाहितेने मोबाइलवरून बहिणीला ही बाब कळवून वडिलांना सांगण्यास सांगितले होते.
वेदनेने विव्हळत होती तरीही कोडगेपणाने गर्भपातासाठी खटपटी....
-दुपारी ३ वाजता गोळ्या दिल्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता विवाहितेला उलटे झोपवून कमल व तिच्यासोबतच्या दोन महिलांनी तिला वरून दाब देण्यास सुरुवात केली. यामुळे विवाहिता वेदनेने विव्हळू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत गेला.-त्यानंतर कमलने पिशवीतून साहित्य बाहेर काढून गर्भ बाहेर काढण्याची तयारी केली. आधीच वेदनेने विव्हळत असलेली विवाहिता घाबरून गेली.
-तेवढ्यात महिलेचे वडील घरी पोहोचले आणि सर्वांनी पोबारा केला. विवाहितेची प्रकृती बिघडली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत तिचा गर्भपात झाला होता. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ११ मार्च रोजी विवाहितेच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने अधिक तपास करत आहेत.
पुन्हा जालना कनेक्शन-मे २०२४ मध्ये पुंडलिकनगर पोलिसांनी गर्भपाताचे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. यात सिल्लोडपासून जालना, भोकरदनपर्यंत डॉक्टर, युनानी डॉक्टरचा सहभाग निष्पन्न झाला होता. रेकॉर्डवरील गर्भपाताच्या डॉक्टरांचा यात सहभाग होता. त्यात पुन्हा जालना कनेक्शन समोर आले आहे.-२०२३ मध्ये हर्सूलमध्ये घरातच गर्भपात करण्याच्या प्रयत्नात विवाहितेचा मृत्यू झाला हाेता.
Web Summary : Doctor restarts illegal abortions after bail; Jalna nurse & lab involved. A woman, forced into gender selection and abortion, was saved by her father. Police investigate the Jalna connection in the abortion racket.
Web Summary : जमानत पर छूटते ही डॉक्टर ने फिर से अवैध गर्भपात शुरू किया; जालना की नर्स और लैब शामिल। एक महिला को लिंग चयन और गर्भपात के लिए मजबूर किया गया, जिसे उसके पिता ने बचाया। पुलिस जालना कनेक्शन की जांच कर रही है।