शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘डमी’ मजूर असेल तर कळवा, अन्यथा कारवाईचा बडगा; घाटी रुग्णालयात विभागप्रमुखांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 16:03 IST

घाटी रुग्णालयातील  विभागप्रमुखांसह जमादार, स्वच्छता निरीक्षकांना नोटिसा

छत्रपती संभाजीनगर : घाटीत महिला एक्स-रे टेक्निशियनने कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्याने एक्स-रे काढताना एका तरुणीसोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार घडल्यानंतर घाटी प्रशासनाला ‘डमी’ कर्मचाऱ्यांसंदर्भात जाग आली आहे. कोणी डमी मजूर काम करीत असेल तर तत्काळ रुग्णालय प्रशासनाला कळवावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशा नोटिसा विभागप्रमुखांसह जमादार, स्वच्छता निरीक्षकांना काढण्यात आल्या.

घाटी रुग्णालयात काही कर्मचाऱ्यांकडून काही रक्कम देऊन इतरांनाच कामावर पाठविण्याचा प्रकार होतो. हा प्रकार ‘लोकमत’ने २७ मे २०२३ रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला होता. तत्कालीन अधिष्ठातांनी याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. परंतु, वर्षभर या ‘डमी’ मजुरांकडे कानाडोळाच झाला. एक्स-रे काढताना झालेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर घाटीतील हे ‘डमी’ कर्मचारी गायब झाले. घाटी प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत ‘डमी’ कर्मचारी आढळला तर जमादार, स्वच्छता निरीक्षक यांना जबाबदार धरण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

आजारी असेल स्वेच्छानिवृत्तीचा पर्यायकर्मचारी आजारी आहे, काम करण्यास अडचण येत असेल अशांना वैद्यकीय मंडळाला पाठविले जाईल. अशा कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येते. त्यांच्या पाल्याला अनुकंपा तत्त्वावर घेता येते.-डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

नोटिसा दिल्याघाटीतील कर्मचाऱ्यांऐवजी इतर दुसरेच कर्मचारी कामावर येत असतील, कळविण्यात यावे, यासंदर्भात विभागप्रमुखांना जनरल नोटीस काढल्या आहेत.-डॉ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी