शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसने 'वंचित'ला साथ दिली असती तर मोठे यश मिळाले असते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:16 IST

"खासदार कल्याण काळेंच्या अहंकारामुळे काँग्रेसची धूळधाण! ‘वंचित’चे जिल्हा निरीक्षक योगेश बन

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निकालात वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये वंचितच्या संपूर्ण पॅनलने विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला आहे. या विजयानंतर वंचितचे जिल्हा निरीक्षक योगेश बन यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अहंकारामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या हातातून गेली," असे खळबळजनक विधान त्यांनी यावेळी केले.

काँग्रेसपेक्षा 'वंचित' मोठी! या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या १ जागेवर समाधान मानावे लागले आहे, तर वंचित बहुजन आघाडीने ४ जागा जिंकत काँग्रेसला पिछाडीवर टाकले आहे. योगेश बन म्हणाले की, "जर काँग्रेस आणि वंचितची युती झाली असती, तर शहरात आमचे किमान ४० उमेदवार निवडून आले असते. मात्र, खासदारांच्या अहंकारामुळे महाविकास आघाडीला फटका बसला." १४ ते १५ जागांवर वंचितचे उमेदवार थोड्या मतांनी पराभूत होऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भाजप आणि पैशाच्या वापरावर टीका निकालावर बोलताना बन यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. "भाजपने संपूर्ण मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्यामुळेच त्यांचे अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत जो पैशाचा पाऊस पडला, तिथे आमची गरीब वंचित आघाडी पडली. आम्हाला १९ जागांची अपेक्षा होती, पण पैशाच्या जोरावर लोकशाहीचा गळा आवळला गेला," असे ते म्हणाले.

प्रभाग ३ मध्ये निर्विवाद वर्चस्व शहरात कुठेही लाट असली तरी प्रभाग ३ मधील मतदारांनी वंचितच्या संपूर्ण पॅनलला निवडून देऊन पक्षावरील विश्वास कायम ठेवला आहे. "आम्ही या निकालाने पूर्णपणे समाधानी नाही, पण भविष्यात अधिक जोमाने काम करून जनतेचे प्रश्न मांडत राहू," असा निर्धार वंचितच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress missed big win in Sambhajinagar by not allying with Vanchit.

Web Summary : Vanchit Bahujan Aghadi's performance in Sambhajinagar elections surprised Congress. A Vanchit leader claimed Congress's ego cost them seats. Vanchit won more seats than Congress. They alleged BJP used money and pressure tactics. Vanchit aims to work harder for the people.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेस