शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

ईडीचा धोका मला नाही; आतापर्यंत चौकशी नाही, होणारही नाही - अनिल परब

By सुमेध उघडे | Updated: July 16, 2021 14:30 IST

Anil Parab News : भाजपकडून सातत्याने राज्यातील अन्य मंत्री सुद्धा ईडीच्या चौकशीत अडकतील असा आरोप होतो.

ठळक मुद्दे भाजपाने ईडीच्या तपासंवरून महाविकास आघाडीवर सातत्याने निशाणा साधला आहे.मी त्यांना उत्तर देणार नाही, मला ज्यांना उत्तर देयचे गरजेचे आहे त्यांना देईल

औरंगाबाद : आरोप करायचे त्यांना करू द्या, माझ्यावर ईडीची कुठलीही कारवाई झालेली नाही आणि होणारही नाही. त्याचा मी जास्त विचारही करत नाही असे रोखठोक मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडले. सध्या परिवहन मंत्री परब औरंगाबाद दौऱ्यावर असून पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी भाजपकडून ईडी चौकशीबाबत सातत्याने होणाऱ्या आरोपांवर भाष्य केले.  ( I am not at risk of ED - Anil Parab) 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता. त्याच्या आधारावर ईडीने देशमुख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यांच्या घरी छापे टाकून खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. आता ईडीने देशमुख यांच्या पत्नीला सुद्धा नोटीस दिली आहे. दरम्यान, भाजपाने ईडीच्या तपासंवरून महाविकास आघाडीवर सातत्याने निशाणा साधला आहे. देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब यांचा क्रमांक लागणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. 

भाजपकडून सातत्याने राज्यातील अन्य मंत्री सुद्धा ईडीच्या चौकशीत अडकतील असा आरोप होतो. केवळ महाविकास आघाडीतील नेतेच ईडीच्या चौकशीत अडकत आहेत. याबाबत अनिल परब यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी, आरोप करायचे त्यांनी करू द्या, मी त्यांना उत्तर देणार नाही, मला ज्यांना उत्तर देयचे गरजेचे आहे त्यांना देईल असे म्हटले. तसेच माझ्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, होणारही नाही असे म्हणत भाजपकडून सातत्याने होणाऱ्या आरोपांवर रोखठोक भूमिका मांडली. 

टॅग्स :Anil Parabअनिल परबAurangabadऔरंगाबादEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAnil Deshmukhअनिल देशमुख