भाजपातला माझा प्रवेश कायमच

By Admin | Updated: May 26, 2014 00:25 IST2014-05-26T00:15:29+5:302014-05-26T00:25:21+5:30

जळकोट : खा. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस (आय) मधून भाजपात प्रवेश घेतला होता. तथापि, काँग्रेसमधील काही जणांच्या दबावापोटी काँग्रेसमध्येच असल्याचे सांगावे लागत होते.

I always have access to BJP, I have always been in the house | भाजपातला माझा प्रवेश कायमच

भाजपातला माझा प्रवेश कायमच

जळकोट : गुढी पाडव्याच्या दिवशी बीड येथे खा. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस (आय) मधून भाजपात प्रवेश घेतला होता. तथापि, काँग्रेसमधील काही जणांच्या दबावापोटी काँग्रेसमध्येच असल्याचे सांगावे लागत होते. परंतु, खा. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत केलेला प्रवेश कायमच असल्याचे प्रतिपादन लक्ष्मणराव अदावळे यांनी जळकोट येथील पत्रकार परिषदेत केले. यावेळी अदावळे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्याने आपण भाजपात जात नसून एक कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केला आहे. प्रवेश करण्यामागे आपली कोणतीही अपेक्षा नसून, पक्ष हेच आपले सर्वस्व मानून मी यापुढील कालावधीतही काम करणार आहे. काँग्रेसनेही आपणास बरेच काही दिलेले आहे. तथापि, काँग्रेसमधील काही नेतेमंडळींकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने आणि मी एक स्वाभिमानी कार्यकर्ता असल्याने आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू नये व यापुढील कालावधीतही समाजाची सेवा करता येईल, यासाठी आपण भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी भाजपाचे खादर लाटवाले, शिवानंद देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: I always have access to BJP, I have always been in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.