शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता

By admin | Updated: June 2, 2014 01:33 IST

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्र व बजाजनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आल्यामुळे एमआयडीसी जल शुद्धीकरण केंद्राची अत्याधुनिक पद्धतीने स्वच्छता करीत आहे.

 वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्र व बजाजनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आल्यामुळे एमआयडीसी जल शुद्धीकरण केंद्राची अत्याधुनिक पद्धतीने स्वच्छता करीत आहे. गेल्या आठवड्यात बजाजनगर तसेच औद्योगिक क्षेत्रात गाळयुक्त पिवळसर दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार उद्योजक तसेच नागरिकांनी केली होती. एमआयडीसीने याच वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकली आहे. पूर्वी जुनाट जलवाहिनीमुळे कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत होता. आता नवीन जलवाहिनी टाकूनही दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी झालेले नाही. एमआयडीसीच्या बजाज कंपनीजवळ असलेल्या जलकुंभाची नियमितपणे साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप उद्योजक व नागरिकांनी केला आहे. पुण्याचे तज्ज्ञ बोलावले पुणे येथील विहान कॉर्पोरेशन एजन्सीचे तज्ज्ञ विलास कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी केली. एमआयडीसीला पाणीपुरवठा करणार्‍या जायकवाडी जलाशयातील पाणी कमी झाल्यामुळे ब्रह्मगव्हाण येथून घेण्यात येत असलेल्या पाण्यातून गाळ व शेवाळ येत आहे. त्यामुळे बजाजनगरमध्ये आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. एमआयडीसीच्या वतीने बजाजगेटजवळील जलशुद्धीकरण केंद्राची रसायन वापरून स्वच्छता करण्यात आली. जलशुद्धीकरण केंद्रात साचलेला गाळ व शेवाळ काढून टाकण्यात आले. पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीचीही स्वच्छता करण्यात येत असल्याचे एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नवाळे यांनी सांगितले. शुद्ध पाण्यासाठी दरमहा १० लाख वाळूज औद्योगिक परिसरासह तसेच बजाजनगर, पंढरपूर, वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, सिडको वाळूज महानगर आदी भागांत शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. पाण्यातील विषारी घटक नष्ट करण्यासाठी अल्गिसाईट तसेच इतर रसायने वापरून शुद्ध पाणी दिले जाईल. यासाठी एमआयडीसीला दरमहा १० ते १२ लाख रुपये खर्च येणार असल्याचे नवाळे यांनी सांगितले.