शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा खून झालाय, किराणा भरायला पैसे नाहीत, पोट कसे भरू? उपोषणार्थीचा प्रश्न

By स. सो. खंडाळकर | Updated: August 5, 2025 19:39 IST

न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही

छत्रपती संभाजीनगर : किराणा भरायला पैसे नाहीत. ३ मुले आहेत. त्यांना शाळेत घालू शकत नाही. नवऱ्याला कारण नसताना मारून टाकलं. मी उघड्यावर पडले आहे. आता मरायची वेळ आली. ८ दिवस या बहिणीकडे, कधी त्या बहिणीकडे रहावं लागतं, ही व्यथा आहे सुजाता दांडगे यांची.

अण्णाभाऊ साठे फाऊंडेशनच्या वतीने त्या सोमवारपासृून उपोषणाला बसल्या आहेत. लोकमतशी बोलताना त्या म्हणाल्या, आत्ताच चक्कर येत आहे. मला बीपीचा त्रास आहे. दुपारी गोळ्या घेतल्या. माझे पती एका कंपनीत काम करून २५ हजार रुपये कमावत होते. त्यातूनच आमचे घर चालत होते. त्यांचा हर्षनगर मनपा शाळेजवळ निर्घृण खून करण्यात आला. खून करणारा मुख्य आरोपी ८ दिवसात तुरुंगातून सुटला. काही आरोपी तुरुंगात आहेत.

मुलांना शाळेत कसे पाठवू?आज खायला मोताद आहे. मोठा मुलगा गौरव हा ११ वर्षांचा आहे. मुलगी स्तुती ८ वर्षांची आहे. या दोघांनाही मी शाळेत घालू शकलेली नाही. कारण शाळेत प्रवेश घेण्यापुरतेही पैसे नाहीत. छोटा मुलगा यश चार वर्षांचा आहे. या सर्वांचे भवितव्य आज अंध:कारमय झालेले आहे.

अशा आहेत मागण्या......सुजाता दांडगे व अमोल गायकवाड यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागण्या अशा :१) फाजलपुरा येथील मनपा शाळेच्या पडक्या इमारतीत रेकी करून व दबा धरून बसलेल्या गुंडांनी रणजीत सुधाकर दांडगे या तरुणाची निर्घृण हत्या केली. त्याच्या पीडित पत्नीस मनपा सेवेत सामावून घ्यावे व आर्थिक मदत करण्यात यावी.२) सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील मलबा पडून मृत्यू पावलेल्या रेखा गायकवाड यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस मनपा सेवेत सामावून घ्यावे व आर्थिक मदत करण्यात यावी

७ महिन्यांचा समरही उपोषणात...राजू भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर चांदणे, सुभाष पाचुंदे, जॉन आव्हाड, रितेश डोके, अक्षय भालेराव, रोहित भालेराव, विलास सौदागर, सुरेश नाडे, योगेश नाडे, रंजना साळवे, उत्तम नाडे, संदीप चांदणे, रंजिता भालेराव आदी या उपोषणात सहभागी झालेले आहेत. सुजाता रणजित दांडगे व तिची दोन लहान मुले, अमोल हरिभाऊ गायकवाड तसेच राजू भालेराव यांचा ७ महिन्यांचा नातू समर भालेराव देखील उपोषणामध्ये सहभागी आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर