शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या प्रियकरावर गोळ्या झाडून कुख्यात गुन्हेगार पती फरार; रक्तबंबाळ तरुण पोलिस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:11 IST

गंगापूर शहरात भरदिवसा गोळीबार; फरार आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना

गंगापूर : कुख्यात गुन्हेगाराने त्याच्या पत्नीचा प्रियकर असलेल्या पूर्वाश्रमीच्या २८ वर्षीय मित्रावर भरदिवसा गावठी कट्टयातून गोळीबार केल्याची घटना गंगापूर शहराच्या जवळ छत्रपती संभाजीनगर मार्गावरील एका चहाच्या हॉटेलमध्ये गुरुवारी (दि.५) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या गोळीबारात सदरील तरुण गंभीर जखमी झाला आहे. आदिनाथ दिलीप जाधव असे जखमीचे, तर महेश काशीनाथ काळे (वय ३०, रा. जामगाव) असे आरोपीचे नाव आहे.

गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील आदिनाथ दिलीप जाधव व महेश काशीनाथ काळे हे पूर्वाश्रमीचे मित्र आहेत. महेशच्या पत्नीचे आदिनाथ सोबत प्रेमसंबंध असल्याने या दोघांत वाद झाला. त्यामुळे त्यांच्यात संवाद नव्हता. या पार्श्वभूमीवर आदिनाथ जाधव हा गुरुवारी दुपारी गंगापूर शहरापासून एक किमी अंतरावर छत्रपती संभाजीनगर मार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा घेत होता. दीड वाजेच्या सुमारास आरोपी महेश काळे हा तेथे आला. त्यानंतर आदिनाथ व महेश यांच्यात वाद झाला. त्यानंतर महेशने स्वतः जवळील गावठी कट्ट्यातून आदिनाथवर तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी आदिनाथच्या पोटात गेली तर दोन गोळ्या त्याला चाटून गेल्या. गोळीबारात त्याच्या पोटाला व मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. गोळीबार नंतर आरोपी महेश काळे हॉटेलच्या मागच्या बाजूने फरार झाला. आदिनाथ सोबतचे मित्र हा वाद सुरू असताना गायब झाले. आदिनाथवर गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी अवस्थेत स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजरआदिनाथवर गोळीबार झाल्यानंतर झटापटीत महेश काळेचा कट्टा घटनास्थळी पडला. यानंतर जखमी अवस्थेत आदिनाथ स्वतः आपली दुचाकी चालवत गंगापूर पोलिस ठाण्यात हजर झाला व महेशने माझ्यावर गोळीबार केल्याचे सांगून त्याने महेशचा कट्टा पोलिसांच्या स्वाधीन केला. दरम्यान पोलिसांनी तपासासाठी तीन पथकांची स्थापना केली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

आरोपी महेश काळे याच्याविरुद्ध १४ गुन्हेआरोपी महेश काळे याच्याविरुद्ध गंगापूर, विरगाव, वाळुज,नेवासा, एमआयडीसी अहिल्यानगर आदी पोलिस ठाण्यात एकूण १४ गुन्हे दाखल असून त्यात बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, दरोडा, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, वाळू चोरी, दुखापत करणे, जाळपोळ करणे आदी प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. काळे यास गंगापूर पोलिसांनी जामगाव येथे कारखाना परिसरात १० ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले होते. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याला छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुलच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. महेश व आदिनाथ हे दोघे जीवलग मित्र असून महेशने आदिनाथवर गोळी का झाडली ? याबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

पत्नीच्या प्रेम संबंधातून केला गोळीबारयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महेश काशिनाथ काळे याच्या पत्नीचे जखमी आदिनाथ दिलीप जाधव याच्यासोबत प्रेसंबध होते. याच रागातून महेशने आदिनाथवर गोळीबार केला. याप्रकरणी आदिनाथ जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून महेश काळे याच्याविरूद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून त्याच्या पत्नीच्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी सदरील महिलेस गंगापूर पोलिस ठाण्यात सायंकाळी आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर