'दोघे संपले, दोघांमधील वाद संपला'; पत्नीच्या खुनानंतर फरार पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 16:18 IST2021-06-04T16:17:36+5:302021-06-04T16:18:29+5:30

Crime in Aurangabad : ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर याचे पत्नी विमलबाई सोबत मागील काही वर्षांपासून वाद सुरु होते.

'Husban-wife dead, the argument between the two is over'; Fugitive husband commits suicide after wife's murder | 'दोघे संपले, दोघांमधील वाद संपला'; पत्नीच्या खुनानंतर फरार पतीची आत्महत्या

'दोघे संपले, दोघांमधील वाद संपला'; पत्नीच्या खुनानंतर फरार पतीची आत्महत्या

ठळक मुद्देवादाचे कारण काय होते याचा उलगडा दोघांच्या मृत्यूनंतर ही झालेला नाही.

फुलंब्री ( औरंगाबाद ) : तालुक्यातील गीरसावळी येथे दिवसांपूर्वी पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीने आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.  ज्ञानेश्वर गाडेकर असे मृताचे नाव आहे. 

ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर याचे पत्नी विमलबाई सोबत मागील काही वर्षांपासून वाद सुरु होते. यामुळे अनेक वर्ष तो औरंगाबाद येथे राहत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे तो गावाकडे आला. यानंतर पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद उफाळून आले. यातून त्याने बुधवारी ( दि २ ) विमलाबाईचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. खून केल्यापासून ज्ञानेश्वर फरार होता. मुलाच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याच्या मागावर असतानाच आज सकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. ज्ञानेश्वरने डोगरकडेला असलेल्या गट ६१ मधील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फुलंब्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज ,फौजदार रघुवीर मुराडे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

दोघांसोबत वादही संपला
पती-पत्नीमधील वाद विकोपाला जाऊन होत्याचे नव्हते कसे होते याचीच प्रचीती यावेळी आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. अनेक वर्ष सुखी संसार चालला. दोन मुले व दोन मुली झाल्या. मात्र, अचानक दोघांमध्ये वाद सुरु झाले.  यातून पन्नाशी ओलांडलेल्या ज्ञानेश्वरला अनेक वर्ष बाहेरगावी राहावे लागले. तो परत आल्यानंतर ही त्यांच्यात जमले नाही. परिणामी वादाचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला. वादाचे कारण काय होते याचा उलगडा दोघांच्या मृत्यूनंतर ही झालेला नाही. शेवटी दोघांसोबत वाद ही संपला.

Web Title: 'Husban-wife dead, the argument between the two is over'; Fugitive husband commits suicide after wife's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.