शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: July 17, 2017 00:32 IST

नांदेड: जिल्ह्यातील जवळपास ७५ कायम विनाअनुदानित उच्च-माध्यमिक शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यातील जवळपास ७५ कायम विनाअनुदानित उच्च-माध्यमिक शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून १९९७ पासून विनावेतन काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्यासंदर्भात शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही़जिल्ह्यात जवळपास १९९७ पासून विनावेतन तत्त्वावर ७५ शाळा चालतात़ या शाळांमध्ये प्रत्येकी ५ ते ७ कर्मचारी कार्यरत आहेत़ या शाळांमधील शिक्षकांना वेतन मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे़ शासनस्तरावरही विविध अहवाल मागविण्याचेच काम मागील काळात झाले आहे़ सन २०१४ मध्ये शासनाने उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे आॅनलाईन मूल्यांकन केले़ या बाबीसही ३ वर्षे पूर्ण झाले आहेत़ मात्र मूल्यांकनात पात्र ठरलेल्या शाळांची यादी शासनाने अद्यापही घोषित केली नाही़ अनेक शाळांचे मूल्यांकन प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षण संचालक कार्यालयातच धूळ खात आहेत़ नांदेडमधील ७५ शाळांमधील कर्मचाऱ्यांसह राज्यातील जवळपास २२ हजार शिक्षकांवर या निर्णयाअभावी उपासमारीची वेळ आली आहे़ कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च-माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने मागील १५ वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे़ शिक्षकांच्या वेतन प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ जुलै रोजी नांदेड-लातूर महामार्गावरील डॉ़ आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष प्रा़ डी़ आऱ नालंदे, प्रा. नागनाथ हिप्परगेकर, प्रा. एम़ ई़ सूर्यवंशी, प्रा़ बालाजी पावडे, प्रा़ डी़जी़ खरात, प्रा़ अंकुश राठोड, प्रा़ के़ डी़ खानसोळे आदींनी दिला आहे़