शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ!

By admin | Updated: August 6, 2014 02:17 IST

रामेश्वर काकडे , नांदेड जिल्ह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना बसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके गारपिटीमध्ये उद्ध्वस्त झाली.

रामेश्वर काकडे , नांदेडजिल्ह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना बसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके गारपिटीमध्ये उद्ध्वस्त झाली. आपद्ग्रस्तांना दिलासा देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पीककर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा जिल्ह्यातील जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात गारपीट व वादळामुळे हजारो हेक्टरवरील पिके आडवी पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणांसाठी टाकलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले होते़ त्यात निराश झालेल्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्गही स्वीकारला़ शासनाकडून मदतीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना होती़ त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हेक्टरी अनुदान दिले. मात्र सध्या खरीप हंगामही काही भागामध्ये हातचा गेल्यात जमा आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे. आॅगस्ट उजाडला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या आहेत़ आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत देण्यासाठी शासनाने त्यांच्या कर्जाचे तीन वर्षांसाठी पुनर्गठन करण्याचा तसेच त्यावर आकारले जाणारे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकसानग्रस्त भागातील पीककर्जदार शेतकऱ्यांना डिसेंबर २०१४ पर्यंत पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत ० टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी जून २०१४ पर्यंत किंवा ३६५ दिवसापर्यंंत व्याजाचा फायदा मिळणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६५ हजार शेतकरी आपद्ग्रस्त असून यापैकी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी पीककर्ज उचलेले आहे.सन २०१३-१४ या वर्षात २ लाख ४१ हजार २२१ शेतकऱ्यांना १४४० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे. एकूण पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी अंदाजे दीड लाख शेतकरी नुकसानग्रस्त भागातील आहेत. तर दुसरीकडे पंचनाम्याच्या जाचक अटीमुळे अनेक भागातील अल्पभूधारक शेतकरी मात्र लाभापासून वंचित राहिले आहेत.