अकरा लाखांच्या दारूसह ट्रक पळविला
By Admin | Updated: May 15, 2014 00:26 IST2014-05-15T00:14:09+5:302014-05-15T00:26:32+5:30
लासूर स्टेशन : तब्बल अकरा लाख रुपये किमतीचे आठशे देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रकच चार चोरट्यांनी घेऊन पसार झाल्याची घटना काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावर घडली.

अकरा लाखांच्या दारूसह ट्रक पळविला
लासूर स्टेशन : तब्बल अकरा लाख रुपये किमतीचे आठशे देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रकच चार चोरट्यांनी घेऊन पसार झाल्याची घटना काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावर घडली. या घटनेत एकूण २१ लाख रुपयांची लूट झाली आहे. ट्रक (क्र. एमएच-२० बीटी-३५६५) चा चालक दशरथ मारोती धोत्रे हा शेंद्रा एमआयडीसीमधून १०,९२,६५२ रुपये किमतीचे ८०० बॉक्स घेऊन मुंबईला जात असताना चालकाने नैसर्गिक विधीसाठी ट्रक सुलतानाबाद शिवारात थांबविला. ट्रककडे येताना लांबून दोन दुचाकीवरील चार माणसे पुढे जाऊन परत आली. तोपर्यंत चालकही गाडीजवळ आला होता. थांबलेल्यांनी चालकाला गाडीत काय आहे, अशी विचारणा केली व चाकूचा धाक दाखवून बाजूला शेतात नेऊन मारहाण करून बाभळीच्या झाडाला बांधून टाकले व त्याच्याकडील मोबाईल व रोख ८०० रुपयांसह ट्रक लासूर स्टेशनच्या दिशेने नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. चालकाने स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत लासूर चौकीत येऊन फिर्याद नोंदविल्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.