औरंगाबादमध्ये दुकानाच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 11:00 IST2018-01-29T10:44:43+5:302018-01-29T11:00:03+5:30
जाफर गेट ते मोंढा नाका रोडवरील सुजित जैन व सुरेश जैन यांच्या मालकीचे निलेश इंटरप्राईजेस अपेक्षा मल्टी सर्व्हिसेस वेल्डिंग मटेरियल तथा सेफ्टी टूल्सच्या दुकानाला रविवारी (28 जानेवारी) रात्री 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली.

औरंगाबादमध्ये दुकानाच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव
औरंगाबाद - जाफर गेट ते मोंढा नाका रोडवरील सुजित जैन व सुरेश जैन यांच्या मालकीचे निलेश इंटरप्राईजेस अपेक्षा मल्टी सर्व्हिसेस वेल्डिंग मटेरियल तथा सेफ्टी टूल्सच्या दुकानाला रविवारी (28 जानेवारी) रात्री 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र गोडाऊनमधील सामानाला लागलेली आग वरील मजल्यावर असलेल्या गोडाऊनच्या भागातही पसरली. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलानं गोडाऊनची भिंत तोडली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्नितांडवात दुकानातील तसेच गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाले. या आगीत अंदाजे लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याचे दुकान मालकाचे म्हणणे आहे.
विशेष या गोडाऊनला लागूनच असलेल्या दुकानाला 3 नोव्हेंबर 2017 रोजी आग लागली होती. दुकान मालकांनी पोलिसांना वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतर ही कोणतीही कार्यवाही अजून झालेली नसताना आज पुन्हा या भागात आग लागल्याने व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.