शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
4
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
5
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
6
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
7
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
8
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
9
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
10
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
11
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
12
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
13
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
14
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
15
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
16
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
17
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
18
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
19
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
20
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी

सिक्युरिटी गार्डच्या मुलाची गगनभरारी, बारावीत मिळवले ९४ टक्के गुण; सीए होण्याचे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:48 IST

मुलाला बारीवी कॉमर्समध्ये ९४ टक्के गुण मिळाले तेव्हाही सिक्युरिटी गार्ड वडील हे ड्यूटीवर हजर होते.

छत्रपती संभाजीनगर : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्ष करत आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी झटणाऱ्या त्या बापाचा उर आज अभिमानाने भरून आला. बापाने स्वत: झिजलेली चप्पल वापरली, सायकलवर फिरला. मुलानेही कष्ट उपसले, हाल सोसले. १२-१२ तास अभ्यास करत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला. अखेर आज त्या कष्टाचे, मेहनतीचे फळ बाप-लेकाला मिळाले. रुपेश रवींद्र उगले या विद्यार्थ्याने बारीवी कॉमर्समध्ये ९४ टक्के गुण मिळवले. जेव्हा मुलाचा निकाल लागला तेव्हाही रुपेशचे सिक्युरिटी गार्ड वडील हे ड्यूटीवर हजर होते.

इमारतींची सुरक्षा करणारे, उन्हातान्हात, पावसात तासनतास उभे राहणारेे वडील रवींद्र उगले म्हणाले, 'मुलगा मोठा व्हावा, हेच माझे स्वप्न होते. आज ते स्वप्न खरे होताना पाहून उर भरून येत आहे. ‘रुपेश हा उज्ज्वलाताई पवार महाविद्यालयाचा विद्यार्थी. त्याच्याकडे अभ्यासासाठी स्वत:चा मोबाइल नव्हता, पण जिद्द होती. वडील कामावर जाताना त्याला कायम एकच गोष्ट सांगायचे, 'आपण गरीब असू शकतो, पण आपलं स्वप्न मोठं असलं पाहिजे.'

सीए होण्याचे आहे स्वप्नआता रुपेशचे स्वप्न आहे चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे. आणि हे स्वप्न आता दूर नाही. तुझ्या या यशाचे श्रेय तू ूकोणाला देशील यावर तो म्हणाला, आई-वडिलांनी माझ्यासाठी घेतलेली मेहनत, केलेला त्याग मला नेहमीच दिसत होता. त्यामुळे या यशाचे संपूर्ण श्रेय त्या दोघांचे आहे. त्यासोबतच ज्या गुरूंच्या मदतीशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो ते आशिष मालानी सर. यांच्या मदतीमुळे अभ्यासातल्या अनेक अडचणी दूर झाल्या.

कधी हट्ट केला नाहीमुलाने मिळवलेले यश आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप खास आहे. कारण, आमच्या कुटुंबात यापूर्वी एवढे टक्के कोणीच मिळवले नव्हते. ९० च्या पुढे जाणारा रुपेश हा आमच्या घरात एकटाच आहे. परिस्थिती कशीही असली तरी त्याने कधी तक्रार केली नाही. माझ्या तुटपुंज्या पगारावर त्याने कधी हट्ट केला नाही. त्यामुळेच आजचा दिवस आम्ही पाहू शकलो.-रवींद्र उगले

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर