HSC Result :'...तरीही ९६६ विद्यार्थी नापास'; औरंगाबाद विभागाचा बारावीचा निकाल ९९.३४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 19:13 IST2021-08-03T19:11:52+5:302021-08-03T19:13:40+5:30
HSC Result 2021 Aurangabad Board : यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावी परीक्षा रद्द करून अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल तयार करण्यात आला.

HSC Result :'...तरीही ९६६ विद्यार्थी नापास'; औरंगाबाद विभागाचा बारावीचा निकाल ९९.३४ टक्के
औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा (HSC Reslut 2021 ) ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत ८.९७ टक्क्याने जास्त लागला असून ९९.३४ टक्के विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. यंदाही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. ( 12th standard result of Aurangabad division is 99.34 percent)
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावी परीक्षा रद्द करून अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल तयार करण्यात आला. यावर्षी बारावीच्या परीक्षेत प्रवीष्ठ झालेल्या १ लाख ४६ हजार ७२६ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४५ हजार ७६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद विभागाचा निकाल ९९.३४ टक्क़े एवढा लागला आहे. ९६६ विद्यार्थी अनुतिर्ण झाले आहेत. या वर्षी १२ वी परीक्षेच्या निकाल तयार करताना अंतर्गत मुल्यमापनामध्ये इयत्ता १० वी व ११ वीचे प्रत्येकी ३० टक्के आणि १२ वीचे ४० टक्के अंतर्गत गुणांचा समावेश करण्यात आला आहे. या परीक्षेत ९९.८८ टक्के मुली, तर ९९.८१ मुले उत्तिर्ण झाले असून मुलांच्या तुलनेत ०.३८ टक्के जास्त मुली उत्तिर्ण झाल्या आहेत.
शाखा निहाय निकाल
विज्ञान शाखेचा ९९.२२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९९.९० टक्के, कला शाखेचा ९९.८४ टक्के आणि एचएससी व्होकेशन अभ्यासक्रमाचा निकाल ९४.३६ टक्के एवढा लागला आहे.
कला शाखेचा निकाल वाढला
विज्ञान शाखेचा मागील वर्षीचा निकाल ९६.९३ टक्के लागला होता, तर यावर्षी ९९.४५ टक्के लागला म्हणजेच २.५२ टक्क्यांनी निकाल जास्त लागला आहे. कला शाखेचा मागील वर्षीचा निकाल ८२.६३ टक्के लागला होता तो यावर्षी ९९.८३ टक्के म्हणजेच १७.२० टक्क्यांनी जास्त लागला आहे. वाणिज्य शाखेचा मागील वर्षीचा निकाल ९१.२७ टक्के लागला होता. तर, यावर्षी ९९.९१ टक्के निकाल जाहीर झाला आहे. म्हणजेच ८.६४ टक्क्यांनी निकाल जास्त लागला आहे.
जिल्हा- प्रविष्ट विद्यार्थी- उत्तीर्ण विद्यार्थी- टक्केवारी
- औरंगाबाद- ५३४४७ -५३१९६, ९९.५३ टक्के
- बीड - ३५०२८ -३४७३९ -९९.१७ टक्के
-परभणी -१९६३१- १९५१० - ९९.३८ टक्के
-जालना - २७७३९ -२७४५४ उत्तीर्ण - ९८.१७ टक्के
- हिंगोली - १०८८१ -१०८६१ उत्तीर्ण - ९९.८१ टक्के