शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर एचएससी कॉपी प्रकरण: अखेर खाजगी शिक्षण संस्थेतील १८ शिक्षक-कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:33 IST

या प्रकरणात जिल्हा परिषदेकडून तीन शिक्षकांचे पूर्वीच निलंबन;  एकूण २१ जण घरच्या वाटेवर!

छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील परीक्षा केंद्रात शिक्षकांच्या मदतीनेच विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली होती. हा प्रकार माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी उघडकीस आणल्यानंतर २४ जणांच्या विरोधात देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील तीन शिक्षकांना निलंबित केले. मात्र, उर्वरित १८ शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी खासगी संस्थेला आदेश दिले होते. त्या आदेशानुसार संस्थेने तत्काळ चौकशी करत १८ जणांच्या निलंबनाचे कार्यादेश सोमवारी काढण्यात आल्याचे लाठकर यांनी सांगितले.

जैतापूर येथील राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्या केंद्रावर नेमण्यात आलेल्या शिक्षक, कर्मचारी आणि बैठ्या पथकाच्या संमतीनेच सामूहिक काॅपी करण्यात आली होती. त्याविषयी सीसीटीव्ही फुटेज आणि अधिकृत अहवालांच्या आधारे सर्वच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशीअंती संबंधित परीक्षा केंद्रावर कर्तव्यावरील काही शिक्षक व सेवकांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सेवा नियमांनुसार निलंबनाची कारवाई केल्याचे लाठकर म्हणाल्या.

खासगी शाळेतील निलंबितांची यादीखासगी शाळेतील निलंबितांमध्ये भगवान निर्मळ, सचिन सातदिवे, नरेश सोनवणे, छाया मुंगे, बळीराम राठोड, आर. के. डरे, संतोष लिहिणार, अनंता गाढेकर, करणसिंग चंदवाडे, दीपक सोनवणे, बाळकृष्ण साळवे, संजय कडवे, संतोष भिंगारे, संजय दाभाडे, पी. सी. आव्हाळे, ऋषिकेश पाटील, राधा पेरे आणि सेवक एस. टी. घुगे यांचा समावेश आहे. यापूर्वीच जि.प.च्या आस्थापनेवरील तीन शिक्षकांना निलंबित केले. त्यामुळे निलंबितांची संख्या २१ वर गेली आहे.

सेवाशर्ती नियमांनुसार कारवाईपरीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णवेळ कार्यान्वित असणे बंधनकारक आहे. परीक्षा कालावधीत होणाऱ्या सर्व घडामोडी सातत्याने रेकॉर्डिंग होणे अत्यावश्यक असून, संबंधित फुटेज सुरक्षित जतन करणे ही केंद्र संचालकांची जबाबदारी आहे. परीक्षा संपताच हे सीसीटीव्ही फुटेज माध्यमिक शिक्षण विभागाकडे जमा करावे लागणार आहे. कोठेही सीसीटीव्हीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर सेवाशर्ती नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.-अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Jaitapur HSC Copy Case: 18 Teachers Suspended from Private School

Web Summary : Following mass copying at Jaitapur's exam center, 18 teachers and staff from a private school have been suspended after an investigation confirmed exam rule violations. CCTV footage revealed the cheating, leading to swift action by education officials.
टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी