शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश
2
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
3
किश्तवाडमध्ये ३-४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले; चकमक सुरु, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादांचा शोध सुरु...
4
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोपिक रुपेरी पडद्यावर येणार, दिग्दर्शक ओम राऊतची घोषणा
5
१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 
6
प्लेऑफ्सची लढाई जिंकली! पण Qualifier 1 च्या शर्यतीत MI स्वबळावर टिकणं मुश्किल, कारण...
7
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
8
उत्तर कोरियाची नवीकोरी युद्धनौका पाण्यात जाताना कोसळली; किम जोंग उन भडकले, सैन्यालाच कारवाईची धमकी दिली
9
"असं वाटलं मृत्यू समोर आलाय", इंडिगो विमानात अडकलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी सांगितली आपबिती
10
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
11
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
12
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
13
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
14
VIDEO : तुफान गारपिटीत सापडले विमान, वैमानिकाने सुखरूप उतरवले; प्रवाशांत प्रचंड घबराट; करु लागले देवाचा धावा
15
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
16
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
17
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
18
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
19
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
20
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा

चक्क गोडावूनमध्ये द्यावी लागतेय बारावीची परीक्षा; औरंगाबादेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 10:06 IST

उपकेंद्राची हलगर्जी, खोटे हमीपत्र दिल्याने होणार कारवाई

औरंगाबाद : गेवराई तांडा परिसरातील स्वप्नपूर्ती कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना चक्क गोडावूनमध्ये बसवून पेपर द्यावे लागत असल्याचा प्रकार बारावी जीवशास्त्र पेपरच्या वेळी समोर आला. या केंद्रावर एका बाजूला मिरची कांडप केंद्र, बाजूला जनावरांचा चारा तिथे गोडावूनच्या शेडमध्ये हिरवी नेट लावून परीक्षेची बैठकीची व्यवस्था करण्यात आल्याचे सोमवारी दिसून आले. नुकतेच निलजगाव शाळेचे प्रकरण राज्यभर गाजले. तोच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शहानिशा न करता उपकेंद्र देण्यातील हलगर्जी पुन्हा एकदा समोर आली.  तणावमुक्त परीक्षेसाठी शाळा तेथे केंद्रावर दहावी, बारावीच्या परीक्षा होत आहे. विविध सुविधांसाठी बोर्डाने हमीपत्रही शाळांकडून घेतले. तोच बारावीच्या पहिल्याच पेपरला निलजगाव शाळेत शामियाना टाकून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्याचा प्रकार समोर आला. त्याच शाळेत पुन्हा काॅपी पुरवण्याचा प्रकार घडल्याने त्या शाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सभागृहात करून असे प्रकार आढळल्यास कारवाईचा इशारा दिला.काॅलेज गावात, परीक्षा गोडावूनमध्ये काॅलेज गावात एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर तर परीक्षा एका गोडावूनमध्ये हिरवे पडदे लावून घेण्यात येत आहेत. या प्रकरणाची विभागीय मंडळाच्या सचिवांनी खातरजमा केली. हमीपत्रात खोटी माहिती दिल्याचे उघड झाले. सोमवारी या गोडावूनमध्ये केवळ बेंच, हिरवी नेट, काॅलेजचा बोर्ड आणि सुरक्षा रक्षक होता. बाजूच्या मसाल्याच्या गिरणीत नियमित काम सुरू होते.विषय तज्ज्ञांच्या तपासणीनंतर निर्णय घेणार १७ मार्चला झालेल्या जीवशास्त्राच्या पेपरवेळी विद्यार्थ्यांना एका गोडावूनमध्ये बसवून परीक्षा घेतल्याचा प्रकार समोर आला. या केंद्रावर प्रश्नपत्रिकांवर पेन्सीलने उत्तरे लिहिल्याचे डाएटच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रश्नपत्रिका व मास काॅपीचा अहवाल बोर्डाला सादर केला. हा अहवाल अद्याप माझ्यापर्यंत पोहोचला नाही. विषय तज्ज्ञ तपासून त्यावर निर्णय होईल. तसेच गोडावूनमध्ये परीक्षा घेतल्याबद्दल संस्थेची सुनावणी घेऊन त्यावर अध्यक्ष कारवाईसंदर्भात निर्णय घेतील, असे सचिव आर. पी. पाटील म्हणाले.शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन सोयीसुविधांची पुन्हा पडताळणी केली. भौतिक सुविधा नसतानाही उपकेंद्र देण्यात आल्याने परीक्षेपूर्वी ८ उपकेंद्रे बदलावी लागली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षा