हृषिकेश काणेच्या अष्टपैलू कामगिरीने जालना संघाचे उस्मानाबादवर वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:36 AM2018-01-16T00:36:21+5:302018-01-16T00:36:32+5:30

हृषिकेश काणे याच्या सुरेख अष्टपैलू कामगिरीच्या बळावर जालना संघाने शिरपूर येथे आज झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १४ वर्षांखालील स्पर्धेत उस्मानाबाद संघाविरुद्ध वर्चस्व राखले.

Hrishikesh Kaane's all-round performance led Jalna team to dominate Osmanabad | हृषिकेश काणेच्या अष्टपैलू कामगिरीने जालना संघाचे उस्मानाबादवर वर्चस्व

हृषिकेश काणेच्या अष्टपैलू कामगिरीने जालना संघाचे उस्मानाबादवर वर्चस्व

googlenewsNext

औरंगाबाद : हृषिकेश काणे याच्या सुरेख अष्टपैलू कामगिरीच्या बळावर जालना संघाने शिरपूर येथे आज झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १४ वर्षांखालील स्पर्धेत उस्मानाबाद संघाविरुद्ध वर्चस्व राखले.
आघाडीचे ७ फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्यानंतर नवव्या क्रमांकावरील हृषिकेश काणे याने जिगरबाज अर्धशतकी खेळी करताना सुशांत काबरा याच्यासोबत केलेल्या झुंजार भागीदारीच्या बळावर जालना संघाने ३३ षटकांत सर्वबाद १५५ धावा केल्या. हृषिकेश काणे याने ६0, तर सुशांत काबरा याने नाबाद ४0 धावांची सुरेख खेळी केली. उस्मानाबादकडून आदिनाथ प्रभाळकर याने ४५ धावांत ४ गडी बाद केले. प्रसाद बहिरे याने ३६ धावांत ३, तर अनुराग कवडेने २ गडी बाद केले. फलंदाजीत चमकदार कामगिरी करणाºया हृषिकेश काणे याने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करताना प्रत्युत्तरात उतरलेल्या उस्मानाबादचा पहिला डाव १0८ धावांत गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. उस्मानाबादकडून आदिनाथ प्रभाळकरने एकाकी झुंज देताना ४८ धावा केल्या. जालना संघाकडून हृषिकेश काणे याने २३ धावांत ३ गडी बाद केले. त्याला केदार बजाज, वैजनाथ देवरे व हर्षल वाघमारे यांनी सुरेख साथ देताना प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यानंतर जालना संघाने सचिन सापा, लक्ष बाबर, केदार बजाज व अभिषेक चोरमारे यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दुसरा डाव ८ बाद ३0२ धावांवर घोषित केला. सचिन सापा याने ६६, लक्ष बाबरने ६0, केदार बजाजने ६२, अभिषेक चोरमारे याने नाबाद ५९ व राजवीर राऊत याने २२ धावा केल्या. उस्मानाबादकडून आदिनाथ प्रभाळकर, अनुराग कावडे व ओमकार देशमुख यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. जालना संघाने विजयासाठी दिलेल्या ३५0 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उस्मानाबाद संघाने ६ बाद १५१ धावा केल्या. त्यांच्याकडून श्रीनिवास घोडकेने २९ व आदिनाथ प्रभाळकरने २१ व अनुराग कवडेने ३५ धावा केल्या. जालना संघाकडून हृषिकेश काणे याने १६ धावांत २ गडी बाद केले. वैजनाथ देवरे, किरण भोईटे व हर्षल वाघमारे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Web Title: Hrishikesh Kaane's all-round performance led Jalna team to dominate Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.