शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आईच कशी झाली कसाई; रुक्सानाची बचावासाठी आर्त हाक..!

By admin | Updated: February 9, 2016 00:26 IST

राजकुमार जोंधळे , लातूर शहरातील अंजली नगरातील एका शाळकरी मुलीचा राजस्थानात जन्मदात्या आईनेच दोन लाखांत सौदा करुन, बळजबरीने लग्न लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राजकुमार जोंधळे , लातूरशहरातील अंजली नगरातील एका शाळकरी मुलीचा राजस्थानात जन्मदात्या आईनेच दोन लाखांत सौदा करुन, बळजबरीने लग्न लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. पीडित मुलीने थेट राजस्थानातून आपल्या पित्याच्या मोबाईलवर संपर्क साधून घडल्या प्रकाराची कैफियत मांडली आहे. ‘अबू मुझे बचाव...मुझे यहाँसे जल्दीसे छुडाओ...अशी आर्त हाक रुक्सानाने (नाव बदलले आहे) आपल्या पित्याला दिली आहे. २१ जानेवारीपासून शाळेत गेलेली रुक्साना घरी परतलीच नाही. सध्याला ती राजस्थानात असल्याचे पुढे आल्याने, पठाण कुटुंबियांना धक्काच बसला. आपल्या पोटच्या मुलीचा दोन लाखात सौदा करणारी आई मात्र फरार आहे. आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाने अस्वस्थ आणि हादरलेल्या जन्मदात्या पित्याने तर इकडे अन्नपाणीही सोडले आहे. पंधरा दिवसांपासून रुक्सानाच्या शोधात पठाण कुटुंबिय पायाला भिंगरी बांधल्यागत भटकत आहेत. रुक्साना राजस्थानात असल्याचे समजल्यानंतर तिच्या सुटकेसाठी कुटुंबियांनी पोलिसांकडे दाद मागितली आहे.लातूर शहरातील अंजली नगरात राहणाऱ्या फिरोज पठाण यांना दोन मुली, एक मुलगा आहे. मार्केट यार्डात ते रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. मोलमजुरीवर आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या पठाण यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याने ते पुरते हादरले आहेत. शहरातील रुकय्याबेगम उर्दु शाळेत रुक्साना इयत्ता आठवीत शिकत होती. २१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता आई जरीना पठाण हिने आपल्या मुलीला शिष्यवृत्तीचे पैसे बँकेतून काढायचे आहेत, असे सांगून शाळेतून शाहू चौकात नेले. येथे मारहाण करुन रुक्सानाला आॅटोत कोंबले. पुढे लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात आणले. येथे शांताबाई आणि राकेश हे दोघे वाट पाहत बसले होते. पीडित मुलगी व तिची आई येताच चौघेही बसमध्ये बसून, राजस्थानात गेले. या घटनेत शांताबाई आणि राकेश या दोघांचाही सहभाग असल्याचे रुक्सानाने आपल्या पित्याला मोबाईलवरुन सांगितले आहे. शेवटी रुक्सानाचा राजस्थानातून अचानक मोबाईलवर फोन आला. पित्याला धक्काच बसला...माँतू कहाँहैं...असे पित्याने आपल्या मुलीला विचारले. रुक्साना तिकडून हुंदके देत म्हणली, आम्मीने मुझे राजस्थान में दो लाख में बेचा हैं...मेरी जबरदस्तीसे शादीभी लगाई हैं...अबू मुझे यहाँ से जल्दी छुडाओ, अबू मुझे बचाव...अशी आर्त हाक दिली आहे. राजस्थानातील झुनझुन येथे रुक्सानाचा दोन लाखात बळजबरीने विवाह लावून देण्यात आला आहे.२ फेब्रुवारी रोजी पठाण यांच्या पत्नी जरीना या एकट्याच घरी आल्या. त्यांनी मुलीला सोबत आणले नव्हते. पठाण यांनी मुलगी कुठे आहे, अशी विचारणा केली. आम्ही दोघी एका ठिकाणी काम करत आहोत. मला १ हजार रुपये द्या, मी तिला घेवून येते, असे सांगून पठाण यांच्याकडून एक हजार घेवून ती गेली. तेव्हापासून ती गायब आहे.