शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वातावरण कसे? औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादंगाने पर्यटनाला फटका बसण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 20:01 IST

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यटक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादंगाने जिल्ह्यातील पर्यटनाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘वेरुळ, अजिंठा लेणी पाहण्यासाठी यायचे आहे, पण सध्या वातावरण कसे आहे ? पर्यटनासाठी यावे की नाही ?’ अशी विचारणा पर्यटकांकडून जिल्ह्यातील टूर व्यावसायिक, गाईड्स यांना होत आहे.

नागपूरच्या तणावानंतर राज्यभरात अर्लट घोषित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर हे राज्याची पर्यटन राजधानी आहे. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ (एलोरा) लेणी, बीबी का मकबरा, देवगिरी किल्ला यासारखी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. या ठिकाणांना दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यटक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. जिल्ह्यातील वातावरण कसे आहे, पुढे परिस्थिती कशी राहील, पर्यटनासाठी यावे की, अन्य स्थळांकडे जावे, अशी विचारणा पर्यटकांकडून टूर व्यावसायिकांना होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या वातावरण निवळले नाही तर पर्यटनाला फटका बसण्याची चिंता व्यक्त होत आहे. विशेषत: खुलताबाद, वेरुळ लेणी, देवगिरी किल्ला येथील स्थानिक रोजगार आणि उत्पन्नावर थेट परिणाम होण्याची भीती आहे.

...तर परिणाम होईलसध्या पर्यटनस्थळांवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, मुंबई, पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांकडून शहरातील वातावरणाविषयी विचारणा होत आहे. अधिक दिवस असेच वातावरण राहिले तर पर्यटनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.- भरत जोशी, गाईड, वेरूळ

चिंतादायक स्थितीऔरंगजेबच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वातावरणाने एजंट्सना शहराच्या स्थिरतेबद्दल विचारणा सुरू झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणतेही टूर रद्द झालेले नाही. परंतु, चिंता निश्चितच आहे. सुदैवाने आपण हंगामाच्या शेवटी येत आहोत.- जसवंतसिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हल्पमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)

‘ग्रोक’ही म्हणाला, पर्यटनाला बसेल फटकाइलाॅन मस्कची आर्टिफिशियल इंटेलिजेन्स कंपनी ‘एक्स एआय’चा चॅटबाॅट ‘ग्रोक’ एआय सध्या चर्चेत आहे. या ‘ग्रोक’ला ‘औरंगजेबची कबर काढण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनास फटका बसेल काय ?’ अशी विचारणा केली. तेव्हा ‘होय’ असे उत्तर देत ‘ग्रोक’ने पर्यटनाला अल्पकालीन आणि कदाचित दीर्घकालीन नुकसान सहन करावे लागू शकते, असे सांगितले. त्याबरोबर कोणकोणत्या क्षेत्रावर त्याचा परिणाम होईल, याची मांडणी केली.

टॅग्स :tourismपर्यटनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangzeb Tombऔरंगजेबाची कबर