शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जलयुक्त शिवार योजनेमार्फत २ हजार कोटीतून २८ टीएमसी पाणी आले तरी मराठवाड्यात दुष्काळ कसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:43 PM

जलयुक्त शिवार अभियानातून तीन वर्षांत ८.१९ लक्ष टीसीएम (थाऊजंडस् क्युबिक मीटर) म्हणजेच २८ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजनेचे कागदी घोडे  एवढे पाणी आले तरी दुष्काळ कसामराठवाड्यातील ३५०० गावांत साठविल्याचा गवगवा  

- विकास राऊत  

औरंगाबाद : जलयुक्त शिवार अभियानातून तीन वर्षांत ८.१९ लक्ष टीसीएम (थाऊजंडस् क्युबिक मीटर) म्हणजेच २८ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या एकचतुर्थांश इतके हे पाणी आहे, असे असले तरी जवळपास पूर्ण विभाग दुष्काळाच्या छायेखाली आल्याने योजनेवर करण्यात आलेल्या २ हजार कोटींचे पाणी कुठे मुरले असा प्रश्न पुढे येतो आहे. 

लोकसहभागातून अंदाजे ३५० आणि शासकीय अनुदानातून सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या खर्चातून ८.१९ लक्ष टीएमसी पाणी मराठवाड्यातील ३५०० गावांत साठविण्यात आल्याचा गवगवा प्रशासन करीत आहे. तीन वर्षांतील ही आकडेवारी कागदोपत्री असली तरी ती कशाच्या आधारे जाहीर करण्यात आली आहे. याचे उत्तर संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे नाही. 

२०१५ ते १८ या कालावधीत १ लाख ५९ हजार ५९९ कामे पूर्ण करण्यात आली. मराठवाड्यातील ३५०० गावे जलयुक्त करण्यात आली, असा दावा प्रशासन करीत आहे. योजनेवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर का, याचे उत्तर मिळणे अवघड होऊन बसले आहे. साचलेल्या पाण्याचे मोजमाप आणि जमिनीत मुरलेल्या पाण्याची आकडेमोड प्रशासनाने कशाच्या आधारे केली, याची माहिती पुढे येत नाही.  जलयुक्त शिवार योजनेतून तीन वर्षांत जेवढे पाणी मिळाले. त्यातून औरंगाबाद शहराला हे पाणी किमान दीड ते दोन वर्षे पुरले असते. ३५०० गावांतील लोकसंख्येला हे पाणी किमान दोन वर्षे तरी पुरणे अपेक्षित आहे; परंतु मराठवाड्यातील सर्वच मंडळात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. तीन वर्षांतील जलयुक्त शिवार योजनेतील पाणी आणि पैसा कुठे मुरला यावर संशोधन हे अपेक्षित आहे. 

१३ योजनांच्या एकत्रीकरणातून अभियान५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान ही योजना पुढे आली. १३ शासकीय योजनांचे एकात्मीकरण असलेल्या या योजनेत कामे आहेत. साखळी बंधाऱ्यांसह नाला खोलीकरण व रुंदीकरण, पाणलोट विकास, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) कामांची दुरुस्ती, नूतनीकरण व पुनर्स्थापना, नव्या-जुन्या सर्व प्रकारच्या छोट्या तलावांतून गाळ काढणे, मध्यम व मोठा प्रकल्पांची सिंचन क्षमता प्रत्यक्ष वापरात येण्याकरिता उपाययोजना करणे, छोटे नाले,ओढे जोड प्रकल्प, विहीर व बोअरवेल यांचे पुनरुज्जीवन, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण आणि कालवा दुरुस्ती. ही कामे एकात्मिक पद्धतीने होणे अपेक्षित होते. ही कामे खरच यापद्धतीने झाली का? असा प्रश्न आहे.

१ टीएमसी पाण्यावर ७१ कोटींचा खर्चजलयुक्त शिवार योजनेतून २८ टीएमसी पाणी मिळाले असेल, तर प्रत्येकी १ टीएमसी पाण्यावर सुमारे ७१ कोटींचा खर्च झाल्याचे प्रमाण येते. एवढा मोठा खर्च होऊन मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.

जलतज्ज्ञांचे मत असेजलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचे आॅडिट कोणत्या आधारे केले आहे. शेततळी किती आहेत. उसाचे क्षेत्र किती आहे, योजनेतील कामातून किती पाणी उपसले गेले. याच्या माहितीतून निष्कर्ष काढता येईल. शेततळी आणि उसाच्या क्षेत्राला पाणी गेले असेल तर सिंचन होण्याचा आणि भूजल पातळी वाढण्याचा मुद्दाच येत नाही. ८.१९ लक्ष टीसीएम पाणी मिळाल्याचा आकडा मोठा आहे. जायकवाडीच्या एकचतुर्थांश इतके हे पाणी आहे. एवढे पाणी जर साचले असेल, तर मराठवाड्यात दुष्काळ  कसा? प्रश्न पुढे येतो आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळWaterपाणीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना