घराला आग लागून सहा लाखांचे नुकसान

By Admin | Updated: June 17, 2014 00:38 IST2014-06-17T00:18:10+5:302014-06-17T00:38:25+5:30

बोरी : जिंतूर तालुक्यातील डोहरा येथे घराला आग लागून अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १४ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली़

House damage to six lakhs | घराला आग लागून सहा लाखांचे नुकसान

घराला आग लागून सहा लाखांचे नुकसान

बोरी : जिंतूर तालुक्यातील डोहरा येथे घराला आग लागून अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १४ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली़
डोहरा येथील गोविंद कऱ्हाळे हे १४ जून रोजी शेतामध्ये कापूस लागवडीसाठी गेले होते़ दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक घराला आग लागली़ या आगीमध्ये घरातील माळवद, मालंग, टीव्ही, कपाट, गहू, ज्वारी, कपडे, रोख दीड लाख रुपये, पाच तोळे दागिने, टीन पत्रे आदी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ अंदाजे ६ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ या बाबत गोविंद कऱ्हाळे यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिंतूरचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही़ गोविंद कऱ्हाळे यांचा संसार उघड्यावर आल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)
जीवितहानी नाही
डोहरा येथे १४ जून रोजी भर दुपारी अचानक घराला आग लागली़ या आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केले़
आग लागल्याचे ग्रामस्थांना समजातच ही आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आला़ त्यामुळे जवळपासच्या घरांना आग लागली नाही़ त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही़

Web Title: House damage to six lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.