शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहे कागदावरच!

By admin | Updated: November 23, 2014 00:26 IST

संजय तिपाले ,बीड ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणप्रवाहातून बाहेर पडू नयेत, या उदात्त हेतूने सर्व शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृहे सुरु केली जातात.

संजय तिपाले ,बीड ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणप्रवाहातून बाहेर पडू नयेत, या उदात्त हेतूने सर्व शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृहे सुरु केली जातात. जिल्ह्यात चालू वर्षी ४८० वसतिगृहांना ंमंजुरी मिळाली आहे; परंतु अनुदान लाटण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचविण्यातच सारे मश्गूल आहेत. एक महिना उशिरा सुरु झालेल्या वसतिगृहांचा एकही अहवाल अद्याप शिक्षण विभागाकडे आलेला नाही. त्यामुळे मजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची वाताहतच आहे. दुष्काळी झळांमुळे यंदा रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे. स्थलांतर करणाऱ्या मजुरांचा आकडा सहा लाखापेक्षा अधिक आहे. स्थलांतरामुळे मजुरांच्या मुला- मुलींच्या शिक्षणात खंड पडतो. त्यानंतर आई- वडिलांच्या हातातील कोयता परंपरेने मुला- मुलींच्या हाती येतो. दारिद्र्याच्या दुष्टचक्रात सापडलेल्या मजुरांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखून त्यांच्यासाठी हंगामी वसतिगृहे सुरु केली जातात. तेथे मुलांचे पालन-पोषण केले जाते. त्याची जबाबदारी शिक्षण समिती व मुख्याध्यापकाकडे सोपविलेली आहे. जेवण, शैक्षणिक साहित्य व निवासी व्यवस्था आदी सुविधा पूर्णपणे मोफत दिल्या जातात. १ आॅक्टोबरपासून वसतिगृहे सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले होते;परंतु स्थलांतर करणाऱ्या संभाव्य कुटुंबातील मुला-मुलींची संख्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयांकडून जि.प. च्या शिक्षण विभागाला प्राप्त न झाल्याने महिनाभर उशिराने वसतिगृहांना मंजुरी मिळाली. २८ आॅक्टोबर रोजी तत्कालिन सीईओ राजीव जवळेकर यांनी सर्वच्या सर्व ४८० प्रस्ताव मंजूर केले होते. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून वसतिगृहे सुरु करावीत असे आदेश शिक्षणाधिकारी (प्रा.) व्ही. डी. कुलकर्णी यांनी दिले होते. मात्र, बहुतांश वसतिगृहे अद्याप सुरुच झालेले नाहीत. वसतिगृहे सुरु केल्यावर त्याचा अहवाल तत्काळ शिक्षण विभागाला पाठविण्याचे आदेश होते;परंतु तीन आठवडे उलटूनही अहवाल आलेलेच नाहीत. त्यामुळे साशंकता व्यक्त होत असून अनुदानावर डोळा ठेऊन वसतिगृहे सुरु असल्याचे दाखविणारे सक्रिय होण्याची शक्यता आहे.