करोडी फाट्याजवळ भीषण अपघात; पोलिसांना खोऱ्याने उचलावे लागले मृतदेहांचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 01:48 PM2021-04-02T13:48:07+5:302021-04-02T13:50:17+5:30

Husband-Wife killed in horrific accident near Karodi Fata : पुलाखालून जात असताना अचानक टाईल्सने भरलेला भरधाव ट्रक समोरून आला व दुचाकीला समोरच्या चाकाखाली घेत दुचाकीवरील पती-पत्नीला फरपटत नेले.

A horrific accident near Karodi Fata; Police had to pick up the remains from the valley | करोडी फाट्याजवळ भीषण अपघात; पोलिसांना खोऱ्याने उचलावे लागले मृतदेहांचे अवशेष

करोडी फाट्याजवळ भीषण अपघात; पोलिसांना खोऱ्याने उचलावे लागले मृतदेहांचे अवशेष

googlenewsNext
ठळक मुद्देअपघात एवढा भीषण होता की, पती व पत्नी दोघांचाही चेंदामेंदा झाला. दोघांच्या मृतदेहाचे अवयव एकमेकांत मिसळले गेले होते. त्यामुळे कोणते अवयव कोणाचे हे देखील ओळखू येत नव्हते.

औरंगाबाद : दुचाकीवरून औरंगाबादकडे  येत असलेल्या पती-पत्नीला समोरून आलेल्या भरधाव  ट्रॅकने  चिरडले. हा  अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार दांपत्याचा  चेंदामेंदा झाला. मृतदेहाचे अवशेष उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला. ही घटना आज सकाळी धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी फाट्याजवळ घडली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संजय पूनमचंद छानवाल (वय-51), मीनाबाई संजय छानवाल (वय-46 दोघे रा. शांतीनगर, परसोडा, लासूर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

या घटनेविषयी प्राप्त  माहिती अशी की, संजय हे पत्नीसह  मोटारसायकलवरून (एम.एच.20 डी.एक्स.3179)  औरंगाबाद शहरात येत होते. धुळे-सोलापूर महामार्गावर  रस्त्याचे काम सुरू आहे. याच पुलाखालून जात असताना अचानक टाईल्सने भरलेला भरधाव ट्रक समोरून आला व दुचाकीला समोरच्या चाकाखाली घेत दुचाकीवरील पती-पत्नीला फरपटत नेले. अपघातात दोघे ठार झाल्याचे पाहुन ट्रक चालक घटनस्थळावरून पळून गेला.

या घटनेची माहिती स्थनिकांनी पोलिसांना देताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. अपघात एवढा भीषण होता की, पती व पत्नी दोघांचाही चेंदामेंदा झाला. दोघांच्या मृतदेहाचे अवयव एकमेकांत मिसळले गेले होते. त्यामुळे कोणते अवयव कोणाचे हे देखील ओळखू येत नव्हते. पोलिसांना अक्षरशः मृतदेहाचा खच खोऱ्याने उचलावा लागला. तर संजय यांचे शीर पोलिसांना आढळून आले नाही. 

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन साठी घाटी रुग्णालयात हलविले असून या प्रकरणी दुपार पर्यंत दौलताबाद पोलीस ठाण्यात फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अशी माहिती पोलीस निरीक्षक आडे यांनी दिली आहे.

Web Title: A horrific accident near Karodi Fata; Police had to pick up the remains from the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.