शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

होम सेंटरमुळे विद्यार्थ्यांना सुविधा; मुख्य केंद्रासह आता उपकेंद्रावरही दहावी, बारावीच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 18:24 IST

SSC/HHC Exam: दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च, तर लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होईल.

औरंगाबाद : औरंगाबाद विभागीय मंडळातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांतून दहावीच्या परीक्षेसाठी ६२६ तर, बारावीसाठी ४०८ मुख्य केंद्रे निश्चित करण्यात आली. मात्र, प्रवेशित शाळा, महाविद्यालयातच (होम सेंटर) परीक्षेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी गुरुवारी स्पष्ट केल्याने विभागात मुख्य केंद्रांना संलग्नित शाळा, महाविद्यालयांत दहावीसाठी १८२२, तर बारावीसाठी ८५५ या उपकेंद्रांवरही परीक्षेचे नियोजन सुरू आहे.

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च, तर लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होईल. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान व लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्चदरम्यान होईल. दहावी, बारावीच्या परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमावर तर प्रात्यक्षिक ४० टक्के अभ्यासक्रमावर आधारित होतील. विभागातून दहावीसाठी १ लाख ८१ हजार ६०२ तर, बारावीसाठी १ लाख ६५ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. औरंगाबाद विभागीय मंडळातील मुख्य केंद्रे, त्यासाठी परीक्षकांची नियुक्ती झाली असून वाढीव केंद्रांची पूर्वतयारी सुरू आहे. संलग्न शाळा, महाविद्यालयांना उपकेंद्र देण्यात येणार असून त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आहे.

पूर्वनियोजनासाठी जिल्हानिहाय बैठकापरीक्षार्थ्यांसाठी विविध सुविधांच्या तयारीसह परीक्षेच्या नियोजनासंदर्भात जिल्हानिहाय बैठका विभागीय मंडळ घेईल. त्यात सुरुवातीला शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर केंद्रप्रमुखांची बैठक जिल्हानिहाय ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक, हेल्पलाईनदहावी, बारावीच्या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी जिल्हानिहाय १-२ समुपदेशक, शंकानिरसनासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात येणार आहे. त्यात शाखा व विभागप्रमुखांचे संपर्क क्रमांक विद्यार्थ्यांना दिले जातील, असे विभागीय सचिव आर. पी. पाटील म्हणाले.

बारावी परीक्षेची जिल्हानिहाय तयारीजिल्हा - काॅलेज संख्या - केंद्र -उपकेंद्र -विद्यार्थीऔरंगाबाद -४७१ -१५३ -२८७ -५८,३४७बीड -२९८ -९९ -१७२ -३८,१४३जालना -२३९ -६९ -१५२ - ३१,३७६परभणी -२३३- ५५ -१६७ -२४,४७१हिंगोली -१२० -३२ -७७ -१३,४७२

दहावी परीक्षेची जिल्हानिहाय तयारीजिल्हा - शाळांची संख्या - केंद्र -उपकेंद्र -विद्यार्थीऔरंगाबाद -९०६ -२२४ -६२१ -६४,६२२बीड -६५२ -१५६ -४७५ -४१,६७६जालना -३९७ -१०० -२७३ -३०,४८३परभणी -४३८- ९३ -३०४ -२८,६९५हिंगोली -२२१ -५३ -१४९ -१६,१२६

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादssc examदहावीEducationशिक्षण